तीन महिन्याचा पगार शहीद जवानाच्या कुटुंबाला, तर पुढील पगार शेतकऱ्यांना, नवनीत राणांची घोषणा

| Updated on: Dec 31, 2020 | 3:26 PM

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमातून नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी असाच एक मोलाचा निर्णय घेतला आहे.

तीन महिन्याचा पगार शहीद जवानाच्या कुटुंबाला, तर पुढील पगार शेतकऱ्यांना, नवनीत राणांची घोषणा
नवनीत राणा
Follow us on

अमरावती : कोरोनाच्या (Corona) या भीषण काळात सर्वच स्तरातून नागरिकांना मोठा धक्का बसला. अशात आता त्यांच्या मदतीला राजकीय नेते धावून येत असल्याचं दिसत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमातून नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी असाच एक मोलाचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्याचा पगार शहीद जवानाच्या कुटुंबाला आणि त्यानंतरचा हा पगार शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणा नवनीत राणा यांनी केली आहे. (Navneet Rana gave Three months salary to the family of martyred soldier and next salary to the farmers)

अमरावती जिल्ह्यातील पिंगळखुटा इथल्या जवान कैलास दहीकर यांचा कर्तव्यावर असताना कुल्लू मनालीत इथं मृत्यू झाला होता. त्यामुळे अकाली जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे अशा कठीण परिस्थिती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपला खासदारकीचा पगार शहीद कैलास दहीकर यांच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 2 लाख 51 हजार रुपयांचा पगार हा नवनीत राणा यांनी शहीद जवानाच्या कुटुंबाला दिला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सैनिक कैलास यांच्या आई वडील आणि पत्नीला हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. अमरावतीत एका कार्यक्रमात हा धनादेश देण्यात आला आहे.

खरंतर, नवनीत राणा या नेहमीच त्यांच्या खास उपक्रमांमुळे चर्चेत असतात. कधी त्या शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत काम करतात तर कधी शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसणं असो. त्यामुळे आताही खासदार राणा यांच्या या निर्णयामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतूक करण्यात येत आहे. दरम्यान, ते यानंतरचा पुढचा पगार हा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे अशीही घोषणा नवनीत राणा यांनी केली आहे. (Navneet Rana gave Three months salary to the family of martyred soldier and next salary to the farmers)

संबंधित बातम्या – 

वर्ष नवे, हर्ष नवा, अजित पवार-देवेंद्र फडणवीस पुण्यात एकाच मंचावर

राम शिंदेंना गटातटाच्या राजकारणात रस, मला विकास करायचाय, रोहित पवारांचं प्रत्युत्तर

‘हर्षवर्धन पाटील संधीसाधू’, सत्यजीत तांबेंची टीका, लेक अंकिता पाटलांचं तांबेंना जशास तसं प्रत्युत्तर

(Navneet Rana gave Three months salary to the family of martyred soldier and next salary to the farmers)