अजितदादांच्या राष्ट्रवादीने गड राखला, पुणे जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

पुणे महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला पुण्यात मोठा धक्का बसला होता, भाजपचा विजय झाला, मात्र त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटानं जोरदार कमबॅक केलं आहे.

अजितदादांच्या राष्ट्रवादीने गड राखला, पुणे जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
NCP
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 09, 2026 | 8:40 PM

पुणे महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट  आणि भाजप आमने-सामने होते.  या निवडणुकीत काटे की टक्कर पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सलग दुसऱ्यांना पुणे महापालिकेत भाजपला मोठं यश मिळालं, तर राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला. मात्र या निवडणुकीनंतर झालेल्या पुण्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाने जोरदार कमबॅक केलं आहे. पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार एकूण 40 जागांवर विजयी झाले आहेत.

या जिल्हा परिषदेमध्ये एकूण 73 जागा असून, त्यापैकी 55 जागांचे निकाल हाती आले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाला या निवडणुकीत आतापर्यंत 40 जागा मिळाल्या आहेत, तर भाजपला अवघ्या 7 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. शिवसेना शिंदे गटाला 4 जागा मिळाल्या असून, शिवसेना ठाकरे गटाला 3 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला अवघ्या 1 जागेवर समधान मानावं लागलं आहे.

विजय उमेदवारांची यादी  

जुन्नर

डिंगोरे: सोनाबाई दाभाडे: (राष्ट्रवादी), ओतूर : छाया तांबे (राष्ट्रवादी), बोरी बु. : कल्पना काळे (राष्ट्रवादी), आळे : मंगेश काकडे (शिवसेना), राजुरी: स्मिता कणसे (शिवसेना शिंदे गट), सावरगाव : गुलाबराव पारखे (शिवसेना ठाकरे गट ), बारव मोनाली लांडे (राष्ट्रवादी), नारायण गाव : नेहा पाटे (शिवसेना)

आंबेगाव

पारगाव अवसरे : विवेक वळसे (राष्ट्रवादी), कळंब: प्रीती थोरात (राष्ट्रवादी शरद पवार), शिनोली: शीला लोहकरे (राष्ट्रवादी), अवसरी बु: विष्णु हिंगे (राष्ट्रवादी), घोडेगाव: सुवर्णा देविदास दरेकर ( शिवसेना)

शिरूर

कवठे यामाई ; राजेंद्र गावडे ( भाजप), न्हावरा: वृषाली वाळके (राष्ट्रवादी), रांजणगाव गणपती: स्वाती पाचुंदकर (भाजप),
मांडवगण फराटा: सुजाता पवार

खेड

नाणेकर वाडी : गणेश बोत्रे (राष्ट्रवादी), कुरळी : विनया मुंगसे (शिवसेना ठाकरे गट ), पाईट: सुनिता बुट्टे पाटील (राष्ट्रवादी)

मावळ

टाकवे बु: अनंता पावसे (राष्ट्रवादी), इंदूरी: पल्लवी दाभाडे (राष्ट्रवादी), खरकाळे : दीपाली हुलावले (राष्ट्रवादी), कुसगाव बु: संतोष राऊत (राष्ट्रवादी), सोमटणे: मनीषा मुरे (राष्ट्रवादी),

मुळशी

पिरंगुट : आबा शेळके (शिवसेना ठाकरे गट)

हवेली

कोरेगाव मुळ: सुरेखा हरगुडे (राष्ट्रवादी), पेरणे: किरण साकोरे (भाजप)

दौंड

खडकी : वीरधवल जगदाळे (राष्ट्रवादी), वरवंड : गायत्री खळदकर, बोरी पार्धी : तुषार रमेश थोरात (राष्ट्रवादी),

पुरंदरे

गराडे: रुपाली झेंडे (राष्ट्रवादी), बेलसर: अजय इंगळे (भाजप), वीर: हरीभाऊ लोळे: (भाजप), निरा शिवतक्रार: प्राजक्ता दुर्गाडे (राष्ट्रवादी)

वेल्हे

विंझर: अमोल नलावडे (राष्ट्रवादी), वेल्हे बु : तानाजी मांगडे (राष्ट्रवादी),

भोर

कामथडी- भोंगवली: विक्रम खुटवड (राष्ट्रवादी), भोलावडे: विठ्ठल आवाळे (भाजप)

बारामती

सूपा: पल्लवी खेत्रे (राष्ट्रवादी), गुणवडी: शुभांगी शिंदे ( राष्ट्रवादी)

इंदापूर

भिगवण: मेघना बंडगर (राष्ट्रवादी), निमगाव केतकी : सोनाली जाधव ( राष्ट्रवादी)