मुंडेंची गच्छंती, टोपे नवे संपर्कप्रमुख! औरंगाबाद पालिकेसाठी राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

| Updated on: Dec 25, 2020 | 9:31 AM

राष्ट्रवादीकडून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची औरंगाबादच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंडेंची गच्छंती, टोपे नवे संपर्कप्रमुख! औरंगाबाद पालिकेसाठी राष्ट्रवादीचा मोठा निर्णय
Follow us on

औरंगाबादऔरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात पक्षात मोठे फेरबदल केले आहेत. राष्ट्रवादीकडून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची औरंगाबादच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (NCP Big responsibility on Rajesh Tope Aurangabad Municipal Corporation elections)

औरंगाबाद जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदावरून धनंजय मुंडे यांची गच्छंती होऊन त्यांच्याऐवजी औरंगाबादच्या संपर्क प्रमुखपदी रादेश टोपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी कोरोना काळात चांगली कामगिरी केली आहे. जनमानसात त्यांची चांगली छबी तयार झाली आहे. त्यांच्या कामाचा आणि छबीचा औरंगाबाद महापालिकेत राष्ट्रवादीला फायदा व्हावा, यासाठी पक्षाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

धनंजय मुंडे यांच्याऐवजी आता राजेश टोपे औरंगाबादच्या संपर्क प्रमुखपदी असणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या संपूर्ण निवडणूक प्रचार तसंच कार्यक्रमाची जबाबदारी राजेश टोपे यांच्या खांद्यावर सोपवली गेली आहे. औरंगाबाद पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळवून देण्याची मोठी जबाबदारी टोपे यांच्यावर असणार आहे.

आतापर्यंत मराठवाड्यातील नेते म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर मराठवाड्यातील निवडणुकीची सगळी जबाबदारी असयाची. किंबहुना मराठवाड्यातील निवडणूक प्रचाराचा प्रमुख चेहरा म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिलं जायचं. मात्र आता राजेश टोपे यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीने औरंगाबाद महापालिकेची मोठी जबाबदारी सोपवली आहे.

कोरोना काळात राजेश टोपे यांची चांगली कामगिरी

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर भारतातही कोरोनाने हैदोस माजवला. विशेषत: महाराष्ट्रात कोरोनाने आपले हातपाय सर्वाधिक पसरले. अशतही आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी आपली जबाबदारी चोख पद्धतीने पार पाडली. अगदी मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून ते राज्यातील जनतेला धीर देत होते. तसेच कोरोनाच्या ऐन काळात विविध हॉस्टिलला भेटी देऊन ते कोरोना वॉरियर्सचा धीर वाढवत होते. राज्यातील जनतेला खूप दिवसांनी असा आरोग्यमंत्री लाभल्याची चर्चा सगळीकडे पाहायला मिळत होती.

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा : अमित देशमुख

औरंगाबाद महापालिकेची लवकरच निवडणूक होणार आहे. ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांची इच्छा असल्याचंही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले आहेत. मुंबईतील गांधी भवन येथे बैठक झाली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मार्गदर्शन केलं. ग्रामपंचायत निवडणूक पक्षाच्या चिन्हाच्या नावे नसते. जी लोक लोकसेवा करतात. ते त्या त्या पातळीवर निवडणुका लढत असतात, असं अमित देशमुख यांनी सांगितलं.

(NCP Big responsibility on Rajesh Tope Aurangabad Municipal Corporation elections)

हे ही वाचा

महापालिका, ग्रामपंचायतीच्या लढाईआधीच मविआत ‘स्वबळाचे’ वारे?