
Ajit Pawar Plane Crash: मुंबईहून बारामती येथे जाताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि अपघातात दादांचा हृदयद्रावक मृत्यू झाला. सांगायचं झालं तर, राज्यातील राजकारण सुन्न झालं, जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची माहिती समोर आली. मंगळवारी सकाळी बातमी आली विमान अपघातात अजित पवार यांचं निधन आणि संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला. तर संपूर्ण पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवार यांच्या अपघाताची माहिती मिळताच, खासदार आणि बहीण सुप्रिया सुळे यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
सकाळी 8.30 वा. सुमारात अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आलेली. सुरुवातीला अजित पवार गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली. पण त्यानंतर समोर आलेल्या माहितीने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. अजितदादांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर पत्नी सुनेत्रा पवार, जय पवार आणि खासदार सुप्रिया सुळे दिल्लीहून बारामतीत दाखल झाले.
पवार कुटुंब बारामती विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्याठिकाणी शरद पवार यांचे जुने सहकारी मित्र विठ्ठल शेठ मणियार उभे होते. विठ्ठल शेठ मणियार यांना पाहिल्यानंतर सुप्रिया सुळे भावूक झाल्या… सुप्रिया सुळेंनी लाडका होता तो… काय झालं असं म्हणत टाहो फोडला. सांगायचं झालं तर, अजित पवार लहान असल्यापासून मणियार यांचे ते लाडके होते.
यावेळी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी देखील अश्रू अनावर झालं… अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठं नुकसान झालं आहे… असं म्हणायला हरकत नाही. बारामती येथे ज्या रुग्णालयात अजित पवार यांचा मृतदेह ठेवण्यात आला आहे. त्याठिकाणी कर्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
कुटुंबीय आणि प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी 4 पासून अजित पवारांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठान, विद्या नगरी चौक येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. रात्री उशिरापर्यंत नागरिकांना दर्शन घेता येईल. तर उद्या म्हणजे गुरुवारी, सकाळी 9 वाजता: गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा विद्या प्रतिष्ठान चौक आणि भिगवण रोड सेवा रस्त्यावरून मार्गक्रमण करेल. सकाळी 11 वाजता: विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर संपूर्ण शासकीय इतमामात दादांवर अंत्यसंस्कार पार पडतील.