AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांना धमकी येणं निषेधार्ह, धमकी देणाऱ्यांचा ब्रेन शोधून काढा – छगन भुजबळांची मागणी

शरद पवारांना मिळालेल्या धमकीनंतर एकच खळबळ माजली आहे. ट्विटरवरून अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे.

पवारांना धमकी येणं निषेधार्ह, धमकी देणाऱ्यांचा ब्रेन शोधून काढा - छगन भुजबळांची मागणी
| Updated on: Jun 09, 2023 | 12:19 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. अशी धमकी देणाऱ्यांचा शोध लावून कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्या तातडीने पोलीस आयुक्तांना भेटल्या. तर छगन भुजबळ यांनी याप्रकरणी कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली.

शरद पवार आणि राऊत बंधू यांना धमकी देणं ही अतिशय संतापजनक आणि काळजीची गोष्ट आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात दाभोलकर, पानसरे तसेच पलीकडे राज्यात लंकेश, कलबुर्गी या सगळ्यांचे मनूवृत्तीच्या लोकांनी जीव घेतले आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारत सरकार काय किंवा महाराष्ट्र सरकार काय , कोणीच या ( हत्यांच्या) मुळाशी जात नाहीत. आणि या सगळ्यांचा जीव घेणारे कोण आहेत, याचा इतकी वर्ष उलटूनही त्यांचा शोध लागत नाही, काहीही कारवाई होत नाही. सरकार काय करतंय , असा सवाल भुजबळ यांनी केला. हे सगळ शोधून काढलं, मुळाशी गेलं तर हे सर्व संपेल, असेही ते म्हणाले.

या धमकीला पवार साहेब किंवा राऊत बंधू भीक घालणार नाहीत, असेही भुजबळ यांनी सांगितले. भारत आणि महाराष्ट्र सरकारने याचा गंभीर विचार केला पाहिजे. या सगळ्याच्या मुळाशी असलेल्या मेंदूचा शोध घेऊन त्यांना पकडलं पाहिजे, अशी मागणी भुजबळांनी केली.

दरम्यान या धमकीनंतर शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

शरद पवार यांना मिळाली होती धमकी

राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली आहे. तर सौरभ पिंपळकर याने ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकी दिली आहे. आयुष्यभर सुपारी कात्रत खाल्ल्यामुळे औरंगजेबाच तोंड मरताना वाकडं होऊन मेलं म्हणते हे खरं आहे का? असं असेल तर इतिहास पुनरावृत्ती करणार म्हणजे, अशी धमकी सौरभ पिंपळकर या ट्विटर अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे.

तो भाजपचा कार्यकर्ता?

सौरभ पिंपळकर या नावाने असलेल्या ट्विटर अकाऊंटवर ही व्यक्ती अमरावतीची असल्याचं म्हटलं आहे. तसेच भाजपचा कार्यकर्ता असल्याचंही त्याच्या अकाऊंटवर नोंदवलेलं आहे. मात्र, हे अकाऊंट ओरिजिनल आहे की फेक आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा