जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, अजित पवारांचं टीकास्त्र, भुजबळांचे टोमणे

रायगड: राष्ट्रवादी काँग्रेसने रायगडमधून निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला सुरुवात केली. रायगडमधील सभेत राष्ट्रवादीच्या आघाडीच्या नेत्यांनी भाजप, शिवसेना, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्तभेटीबाबत गौप्यस्फोट केला.  शिवसेन-भाजपमध्ये भांडणं असतात, तर मुख्यमंत्र्यांना भेटायला उद्धव ठाकरे सांताक्रुझच्या कॉफीटेल हॉटेलला नाक घासत का […]

जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, अजित पवारांचं टीकास्त्र, भुजबळांचे टोमणे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

रायगडराष्ट्रवादी काँग्रेसने रायगडमधून निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला सुरुवात केली. रायगडमधील सभेत राष्ट्रवादीच्या आघाडीच्या नेत्यांनी भाजप, शिवसेना, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्तभेटीबाबत गौप्यस्फोट केला.  शिवसेन-भाजपमध्ये भांडणं असतात, तर मुख्यमंत्र्यांना भेटायला उद्धव ठाकरे सांताक्रुझच्या कॉफीटेल हॉटेलला नाक घासत का गेले, असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

दुसरीकडे अजित पवार म्हणाले “आता थांबायचं नाही. सरकार उलथून टाकेपर्यंत थांबायचं नाही, भाजपने दिलेली अश्वासने पूर्ण केली नाहीत. गाजरं दाखवली. कर्जमाफीचं खोटं अश्वासन दिलं. 15 लाख खात्यात अजून आले नाहीत. एक कोटी तरुणांच्या नोकर्‍या गेल्या. खोटं बोला पण रेटून बोला असा कारभार सुरु आहे”

तर भुजबळांनी आपल्या शैलीत टीकास्त्र सोडलं. मोदी यांची डिग्री, चाय, लग्न फेल, घर फेल, नोटाबंदी फेल आणि आता राफेल फेल, असं भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांच्या भाषणातील मुद्दे -देशातील आणि राज्य सरकारचं परिवर्तन करायचं आहे. इतिहासात जुलमी राज्यासोडविण्यासाठी छत्रपतींनी राज्यक्रांती करुन परिवर्तन केलं. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्यावर मनुस्मृती जाळली होती. त्यामुळे इथून परिवर्तन संपर्क यात्रेला सुरुवात केली.

-देशात मनुवाद उफाळतोय. भिडे बागेतील आंबा खाल्ल्यावर मूल होण्याचा सल्ला दिला जातोय. फुले शाहू आंबेडकर यांनी शिका संघटित होण्याचा अवाहन केलं, मात्र हे सरकार आपल्याला मागं नेत आहे.

-कोणी काय खावं यावरुन हत्या केल्या जातात. उत्तर प्रदेशात पोलीस अधिकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली. सध्या दहा हजार खात्यात टाकण्याचा अश्वासन मात्र हा एक जुमला आहे. कदाचित हे बँका खाली करुन पैसे देतील मात्र निवडून आल्यावर कैकपटीने वसूल करतील

-मोदी गेल्या निवडणुकीत नाशिकला आले त्यावेळी त्यांनी कांदा उत्पादकांना दु:ख नाहीसे करण्याचं आश्वासन दिलं. उत्पादन खर्चाच्या अधारीत खर्च देण्याचं अश्वासन दिलं, मात्र हा जुमला होता. कर्जमाफीचाही जुमला

-भाजपला सत्तेचा माज आलाय. नाशिकला नोटीस बजावली मात्र आम्ही तख्त पलटून टाकू. हिटलर सुद्धा राहिला नाहीतर हे कोण आहेत.

-आरक्षणा सर्वांना मिळावं, आता ओबीसी आरक्षणात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही दाखल व्हायला नको होती मात्र दाखल झाली. सरकार ओबीसी आणि मराठ्यांमध्ये  भांडण लावत आहे.

-मराठा आणि ओबीसी समाजाला सावध रहावं लागेल. आपली लढाई, आपल्याला झुंजवणाऱ्यांविरोधात आहे. सवर्ण आरक्षणही भुलभुलैया आहे.

-शिक्षणाऐवजी पकोडा विकायचा सल्ला देतात. बनेगा पकोडा बनेगा चाय और स्कूल गया भाडमे

-अमित शहांनी सेनेला पटक देंगे असे म्हटले मात्र बाळासाहेब असते तर शहांना लाथ घातली असती.

युती करा नाहीतर नका, पण लोकांना का फसवता. उद्धव ठाकरे हे चोर म्हणतात तर मग चोर कोण सांगा. तुम्ही सत्तेत असून तुमची तेवढीच जबाबदारी आहे. भांडणं करत असून तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना, अशी अवस्था आहे.

-उध्दव ठाकरे म्हणतात सरकार नालायक आहे तर मग असंगाशी संग का केला. लोकं वाण नाहीतर गुण लागला. ढवळ्या शेजारी बांधला पवळा असं बोलतील

-नितीन गडकरी यांनी आमचं सरकार येणार असे वाटत नव्हते त्यामुळे आम्ही नुसतं जाहीर करत होतो म्हटलं. मात्र आता काहीच मिळत नाही.

-आता विकास सोडून दुसरं बोलतात. मोदी यांची डिग्री, चाय, लग्न फेल, घर फेल, नोटाबंदी फेल आणि आता राफेल फेल

-राहुल गांधी हे सतत राफेलवर बोलत आहेत मात्र मोदी काहीच बोलत नाही. अंबानी यांनी खेळण्यातील विमानही बनवलं नाही, मात्र त्यांना ठेका दिला. सर्वांवर दादागिरी करत आहे. संविधानाने आम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे.

-लिखाणाचं स्वातंत्र्य नाही. अनेक वृत्तवाहिन्यांवर दबाव आणला. अनेकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या. नयनतारा सेहगल यांनी समस्यांवर बोट ठेवल्यावर त्यांना रोखलं.

-मीडीयावर, लिखाणावर बंधन. कोणी ईडी बीडी चौकशी करेल. महाराष्ट्र सदन बहोत सुंदर आणि बनानेवाला अंदर.

-शंभर कोटी ठेका तर साडे आठशे कोटी कसं खाल्ले. मला अटक करणार्‍याला पण माहिती नाही का अटक केली. अटक फक्त दुसर्‍यांना धमकावण्यासाठी, तुमचा भुजबळ करण्याची धमक दिली जाते.

-हर घर मोदी नाहीतर घरघर लागली आसून घरवापसी सुरु झाली आहे. कुठं नेऊन ठेवला हिंदुस्थान आमचा

अजित पवारांच्या भाषणातील मुद्दे

-आता थांबायचं नाही. सरकार उलथून टाकेपर्यंत थांबायचं नाही, -देशाची अखंडता, महागाई, बेरोजगारी, बळीराजाला सन्मानासाठी राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा आहे.

– दिलेली अश्वासने पूर्ण केली नाहीत. गाजरं दाखवली. चुनावी जुमला करत आहे

-कर्जमाफीचं खोटं अश्वासन दिलं. पंधरा लाख खात्यात आजून आले नाही. एक कोटी तरुणांच्या नोकर्‍या गेल्या.

-आचारसंहिता लागणार आहे त्यापूर्वीच आर्थिक दृष्टीने मागास सवर्णांना आरक्षण जाहीर केलंय.

– गरिबाला का आरक्षण नाही. कर भरणाराला आरक्षण मात्र चूल पेटत नाही त्याला काहीच नाही. शेतकरी विरोधी आणि सुटबुटाचं सरकार आहे. कर्जबुडव्यांना काही करत नाही मात्र गरिबांची भांडीकुंडी काढली जातता – छत्रपती स्मारकाची एक वीट तरी आतापर्यंत रचली का? 72 हजार मेगा भरतीत किती नोकरी दिल्या? – 2022 पर्यंत सर्वाना घर देणार असल्याची नवी टूम आणली. 2022 ला आजून तीन वर्ष आहेत. आताचं काय ते बोला .आता का घरं बांधत नाही? -इथले लोकप्रतिनिधी अवजड खातेचे मंत्री आहेत मात्र ते अवजड आहे का अवघड मंत्र आहेत. हे कळत नाही.

-आमची आघाडीची जागावाटप सुरु आहे. रायगडची जागा राष्ट्रवादीला मिळाली तर आम्ही तटकरे साहेबांना उमेदवारी निर्णय घेतला. नागरिकांनो तुम्ही आता बटणं दाबा बाकी आम्ही पाहतो.

-यांचे मंत्र्यांना बोलायचं कळत नाही. वाचळवीर आहे. लोकांना टाकून बोलतात. -भाजप सेना दोघं एकमेकांवर आरोप करत आहेत, मात्र लोकसभेला दोघं एकत्र येतील

-राज्यात आणि देशात बळीराजाचं सरकार आणण्याची आम्ही शपथ घेतली. दोघांना सत्तेतून दूर करणार. यासाठी समविचारी पक्षांना एकत्र करत आहे

-शरद पवार दिल्लीत देशातील सर्व समविचारी नेत्यांना भेटत आहे. फारुक अब्दुल्ला, अखिलेश यादव, चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेकांबरोबर चर्चा करत आहेत

-सोलापूर विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांना पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवण्याचा ईशारा दिल्यावर सरकार कारवाईची नोटिस बजावत आहे.

जयंत पाटील यांच्या भाषणातील मुद्दे

-भाजपच्या कचाट्यातून महाराष्ट्र सोडवण्याची गरज आहे, राज्यातील जनता मुख्यमंत्र्यांना कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र असा सवाल करत आहे

-तरुणांनी प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री कारवाई करण्याचा इशारा देतात. अश्वासनांवर जाब विचारला जातो. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात लोकांना तुरुंगात टाकत आहे. धर्मा पाटलांच्या पत्नीला आणि मुलाला जळगाव दौऱ्यावर असताना तुरुंगात टाकलं

-हुकूमशाहीनं जाईल तिथं लोकांना तुरुंगात टाकत आहे. सांगलीत काही कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकलं तर सोलापुरात आमच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिल्यावर कारवाई होते.

-मोदींची अश्वासन खरी ठरली नाहीत. सोलापूर चादरचं कौतुक केलं, पंतप्रधान झाल्यावर विकासाचं अश्वासन दिलं मात्र चादर कारखाने बंद झाले. अशीच परिस्थिती कोल्हापूरच्या चप्पल बनवणाऱ्याची अवस्था.

-बोलण्यात आणि कृतीत फरक असलेला मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आहेत

– आता भाजपची लाट राहिली नसून वाट लागली आहे. राज्यात परिवर्तनाची गरज आहे.

– काँग्रेस आघाडी अंतिम टप्प्यात आहे. शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात चर्चा झाली आहे. रायगड ही जागा राष्ट्रवादीकडं असून तटकरे यांना लोकसभेत पाठवावे.

– देशात सीबीआई आणि अंमलबजावणी संचालनालयाचा विरोधकांच्या विरोधात वापर केला. सीबीआय संचालक राफेलवर गुन्हा दाखल करेल म्हणून वर्मांना काढलं, तर न्यायालयाने पुन्हा त्यांना अधिकार बहाल केले. सरकारवर मोठी नामुष्की ओढवली

-सरकारनं पाच वर्षांत राज्याची आधोगती केली. फडणवीस आणि ठाकरे सरकारनं पाच लाख कोटी पेक्षा जास्त कर्ज राज्यावर करुन ठेवले

– गडकरी साहेबांनी सिंधुदुर्गात रस्तासाठी नारळ फोडला मात्र काम झालं नाही. अनेक ठिकाणी असंच सुरू आहे.

– देशातील सभ्य माणूस अमित शहा असल्याचं मी समजतो. त्यांनी सेनेको पटक देंगे असा इशारा दिला. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी याचा यथेच्छ समाचार घेतला आसता. यावर भुजबळ साहेब बोलतील.

– दोघांत भांडणं असतात तर मुख्यमंत्र्यांना भेटायला उद्धव ठाकरे सांताक्रुझला सोफिटल हॉटेलला नाक घासत का गेले?  बाळासाहेब ठाकरे यांचे रक्त असेल तर सकाळपर्यंत सरकामधून बाहेर पडा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.