‘मी कशाला राष्ट्रवादी वाढवू? माझे पती भाजप आमदार’; अर्चना पाटील यांचा व्हिडीओ ट्विट करत रोहिणी खडसेंचा निशाणा

अर्चना पाटील या धाराशिव मतदारसंघात प्रचारासाठी फिरत आहे. या दरम्यान पत्रकारांनी त्यांना बार्शीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फारसं वर्चस्व नाही. फक्त आमदार रांजेद्र राऊत आहेत. त्यांचाच इथे गट आहेत. तुम्ही राष्ट्रवादी वाढवणार आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन रोहिणी खडसे यांनी निशाणा साधला आहे.

मी कशाला राष्ट्रवादी वाढवू? माझे पती भाजप आमदार; अर्चना पाटील यांचा व्हिडीओ ट्विट करत रोहिणी खडसेंचा निशाणा
अर्चना पाटील आणि रोहिणी खडसे यांचा फोटो
| Updated on: Apr 07, 2024 | 9:20 PM

धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा एक व्हिडीओ सोशल मीडिआवर व्हायरल झाला आहे. अर्चना पाटील यांनी नुकतंच भाजपमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अर्चना पाटील या भाजप आमदार राणाजगजितसिंग पाटील यांच्या पत्नी आहेत. तीन दिवसांपूर्वी अर्चना पाटील यांचा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. यावेळी सुनील तटकरे यांनी अर्चना पाटील या धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतील, अशी घोषणा केली. पण उमेदवारी घोषित झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत अर्चना पाटील या वादात सापडल्या आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मी कशाला राष्ट्रवादी वाढवू? असं ते पत्रकारांना प्रतिक्रिया देताना म्हणत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत टीका केली आहे.

अर्चना पाटील या धाराशिव मतदारसंघात प्रचारासाठी फिरत आहे. या दरम्यान पत्रकारांनी त्यांना बार्शीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फारसं वर्चस्व नाही. फक्त आमदार रांजेद्र राऊत आहेत. त्यांचाच इथे गट आहेत. तुम्ही राष्ट्रवादी वाढवणार आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. रोहिणी खडसे यांनी संबंधित व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला आहे. “टिक टिक वाजते डोक्यात, धड धड वाढते ठोक्यात… फक्त कमळच आहे डोक्यात, घड्याळ आहे उसनवारीत..!”, असं ट्विट रोहिणी खडसेंनी केलं आहे.

अर्चना पाटील नेमकं काय म्हणाल्या आहेत?

“मी कशाला वाढवू? म्हणजे मला कळतच नाही. मी महायुतीची उमेदवार आहे. माझी महायुतीची उमेदवारी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि महायुतीच्या खासदारांचा आकडा 400 पार जाण्यासाठी आहे. राजेंद्र राऊत हे महायुतीचे घटक आहेत. माझा नवराच भाजपचे आमदार आहेत. मला इकडून निवडून देणार आहेत. मला राजेंद्र राऊत यांचा पाठिंबा असल्याने कोणत्याही गटापेक्षा महायुती वाढणार आहे”, असं अर्चना पाटील संबंधित व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.