डिलिमिटेशन बिलानंतर… शरद पवारांचा पक्ष एनडीएत कधी जाणार? खासदारांनं दिली हिंट, नव्या चर्चेला उधाण!

एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांना आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारचे स्पष्टीकरण आल्यानंतरच पक्षाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डिलिमिटेशन बिलानंतर... शरद पवारांचा पक्ष एनडीएत कधी जाणार? खासदारांनं दिली हिंट, नव्या चर्चेला उधाण!
sharad pawar party nda alliance
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 24, 2026 | 4:14 PM

केंद्र सरकारला देशात डिलिमिटेशन बिलावर तोडगा काढायचा आहे. पण त्यासाठी आवश्यक संख्याबळ त्यांच्याकडे नाही. पण विरोधकांनी त्यांना यासर्वप्रकरणात पाठिंबा दिला पाहिजे, अशी भूमिका केंद्र सरकारमधील मंत्र्यांकडून मांडली जाते. याच डिलिमिटेशन बिलावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील मतभेद समोर आले होते. याच घडामोडींदरम्यान आता एनडीएसोबत जाण्याच्या प्रश्नावर शरद पवारांच्या पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. ते पंढरपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

‘डिलिमिटेशन कसे होणार हे समजल्यावर पक्षाच्या बैठकीत निर्णय होईल’

डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून शरद पवारांचा पक्ष केंद्रात एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र सरकारकडून डिलिमिटेशन कसं करणार आहेत, याचे अजून स्पष्टीकरण नाही. त्यामुळे ज्यावेळेस सरकार स्पष्टीकरण देईल, त्यावेळेस पक्षाच्या बैठकीत योग्य तो निर्णय होईल, अशी माहिती माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिले आहे. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या चर्चांवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज आपली प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Loading...

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अनेक दिवसांपासून एनडीएत सामिल होण्याच्या चर्चा आहेत. आता मात्र डिलिमिटेशननंतर पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी हे इंडिया आघाडीचं मत नाही. महाविकास आघाडीचंही मत नाही, असं म्हटलं होतं. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी डिलिमिटेशनला विरोध दर्शवला आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी 50 टक्के जागा वाढणार असतील, तर आपण डिलिमिटेशनला पाठिंबा देऊ, असं म्हटलं होतं. त्यानंतप भाजपकडून अनेकांनी सांगितलं की, महाविकास आघाडीतील अनेक खासदार या बिलाला पाठिंबा देतील. पण याबिलावरुन काँग्रेसने विरोधीाची भूमिका घेतलेली आहे. त्याचवेळी अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. पण याप्रकणी पुन्हा एकदा भाष्य करत सुप्रिया सुळेंनी बिल आल्यानंतर सविस्तर भूमिका मांडेन असं म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us