AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonu Nigam: सोनू निगमने मुंबईत खरेदी केली तब्बल इतक्या कोटींची प्रॉपर्टी; दोन वर्षांत रिअल इस्टेटमध्ये 123 कोटींचे व्यवहार

Sonu Nigam: गायक सोनू निगमने मुंबईतील सांताक्रूझ पश्चिम इथं कोट्यवधी रुपयांची व्यावसायिक मालमत्ता खरेदी केली आहे. गेल्या दोन वर्षांत त्याने रिअल इस्टेटमध्ये 123 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे व्यवहार केले असून त्याच्या इतर मालमत्तांचीही चर्चा रंगली आहे.

Sonu Nigam: सोनू निगमने मुंबईत खरेदी केली तब्बल इतक्या कोटींची प्रॉपर्टी; दोन वर्षांत रिअल इस्टेटमध्ये 123 कोटींचे व्यवहार
Sonu NigamImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 24, 2026 | 4:12 PM
Share

Sonu Nigam: बॉलिवूडचा लोकप्रिय गायक सोनू निगम आपल्या सुरेल आवाजामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र, यावेळी तो त्याच्या गाण्यांमुळे नव्हे, तर कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टी डीलमुळे चर्चेत आला आहे. सोनू निगमने मुंबईतील सांताक्रूझ पश्चिम परिसरात तब्बल 31.47 कोटी रुपयांची व्यावसायिक मालमत्ता खरेदी केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांत त्याने रिअल इस्टेट क्षेत्रात 123 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे व्यवहार केले आहेत. यात मालमत्ता खरेदी आणि विक्री या दोन्हींचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशनच्या वेबसाइटवरील नोंदणी कागदपत्रांनुसार, सोनू निगमने नोव्हेंबर 2026 मध्ये ही मालमत्ता खरेदी केली. सांताक्रूझ पश्चिम इथल्या डीएलएच बेस्टसेलर इमारतीमधील या व्यावसायिक जागेत तळमजल्यावर 1090 चौरस फुट आणि पहिल्या मजल्यावर 1140 चौरस फुट क्षेत्रफळ आहे. अशा प्रकारे या संपूर्ण प्रॉपर्टीचा कार्पेट एरिया 2230 चौरस फुट आहे. या व्यवहारात एका पार्किंग जागेचाही समावेश आहे. या खरेदीसाठी सोनू निगमने 1.88 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरले आहेत.

सोनू निगमची अलीकडील प्रॉपर्टीची खरेदी-विक्री

  • सोनू निगमने सांताक्रूझ पश्चिम इथं 31.47 कोटी रुपये किंमतीच्या कमर्शिअल प्रॉपर्टीची नोंदणी नोव्हेंबर 2026 मध्ये केली.
  • अंधेरी पश्चिम इथं 44.30 कोटी रुपये किंमतीचा आलिशान अपार्टमेंट त्याने गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये खरेदी केला होता. हा अपार्टमेंट जुहू-वर्सोवा लिंक रोडवरील ‘वर्तमान’ इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आहे. त्यात चार गाड्यांसाठी पार्किंगचीही जागा आहे.
  • अंधेरी पश्चिममधील तीन कमर्शिअल युनिट्स 17 कोटी रुपयांना ऑक्टोबर 2026 मध्ये खरेदी करण्यात आले. त्यांचा एकूण कार्पेट एरिया 4,144.10 चौरस फूट आहे. सोनू निगमने ही युनिट्स त्याच विक्रेत्याला दरमहा 12 लाख रुपयांना परत भाड्याने दिली आहेत.
  • कर्जतमध्ये जमिनीची विक्री- सोनू निगमने 2026 मध्ये महाराष्ट्रातील कर्जत इथं जमिनीचे अनेक भूखंड विकले. एप्रिल 2026 मध्ये त्याने 1.9 हेक्टरपेक्षा जास्त जमीन 1.95 कोटी रुपयांना आणि मे 2026 मध्ये 1.067 हेक्टर जमीन 95 लाख रुपयांना विकली.
  • बीकेसीमधील कमर्शिअल प्रॉपर्टीची विक्री- याचवर्षी त्याने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स इथली कमर्शिअल कार्यालयाची जागा 18 कोटी रुपयांना विकली. ही जागा नोव्हेंबर 2023 मध्ये 14.3 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली होती.
  • वीरा देसाई रोडवरील कमर्शिअल जागा- मार्च 2023 मध्ये त्याने वीरा देसाई रोडवर कमर्शिअल जागा खरेदी केल्या होत्या.
  • सांताक्रूझमधील एक कमर्शिअल प्रॉपर्टी- 2023 मध्ये सोनू निगमने सांताक्रूझमध्ये एक कमर्शिअल प्रॉपर्टी भाडेतत्त्वावर घेतली.
  • मुंबई आणि दुबईतील घरं- या सर्वांव्यतिरिक्त सोनू निगमचं मुंबईत एक आणि दुबईत एक घर आहे.
  • सोनू निगमचे वडील अगम कुमार निगम यांनीही फेब्रुवारी 2026 मध्ये मड आयलँडमध्ये 10 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली.

सोनू निगमने हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. ‘कल हो ना हो’, ‘सूरज हुआ मद्धम’ आणि ‘अभी मुझ में कहीं’ यांसारख्या गाण्यांमुळे तो लोकप्रिय झाला. त्याला 2022 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. संगीत क्षेत्रातील कारकिर्दीसोबतच रिअल इस्टेटमधील त्याच्या व्यवहारांमुळेही तो सध्या चर्चेत आहे.

Follow Us
संदीप देशपांडेंच्या व्हिडिओवर सचिन अहिर आक्रमक; मांसाहार बंदीवरही...
संदीप देशपांडेंच्या व्हिडिओवर सचिन अहिर आक्रमक; मांसाहार बंदीवरही सरकारला घरचा आहेर!
देवराम लांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; राज ठाकरेंच्या उल्लेखाने..
देवराम लांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; राज ठाकरेंच्या उल्लेखाने मनसे आक्रमक
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपद
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?
रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
Pratap Sarnaik on Rohit Pawar : रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने...
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने चर्चांना उधाण!
आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये...
Onion Price Crash : आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके...
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात....
Manoj Jarange Case : मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात; पेन ड्राइव्हमधील पुराव्याने खळबळ
रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
Parinay Fuke : रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही....
Gold Silver Price Today : जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही 2000 रुपयांची वाढ VIDEO बघाच