NEET Exam 2026 Paper Leak: मोठा ट्विस्ट! मनीषा हवालदारची धक्कादायक कबुली, थेट त्या व्यक्तीचंच नाव घेतलं
NEET Exam 2026 Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीमध्ये मनीषाने धक्कादायक माहिती दिली आहे. तिने थेट एका व्यक्तीचे नाव घेतले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नीट पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देशल हादरुन टाकला आहे. दररोज या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आहे. या प्रकरणी आतापर्यंत अनेक लोकांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. सीबीआयच्या (CBI) कोठडीत असलेल्या मनीषा हवालदार या आरोपीने मोठी अपडेट दिली आहे. तिने आपण कोणाच्या सांगण्यावरून हा पेपर फोडला, याची माहिती तपास यंत्रणांना दिली आहे.
एनटीए अधिकाऱ्याचा सहभाग उघड
परीक्षा आयोजित करणाऱ्या ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या (NTA) पॅनलमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनेनुसारच आपण प्रश्नपत्रिका फोडल्याचे मनीषाने सीबीआय चौकशीत स्पष्ट केले आहे. या खळबळजनक माहितीमुळे आता थेट परीक्षा घेणाऱ्या संस्थेचेच अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत आणि संपूर्ण नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
व्हॉट्सॲपवरून पेपरचे वाटप
मनीषा हवालदारने सीबीआयला दिलेल्या जबाबात सांगितले की, तिने परीक्षेपूर्वीच भौतिकशास्त्र (Physics) या विषयाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे अनेक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. ही सर्व गोपनीय माहिती तिने मनीषा मांढरे नावाच्या दुसऱ्या एका महिलेला थेट व्हॉट्सॲपवरून पाठवली होती. या संपूर्ण कटात मनीषा हवालदार ही मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या दोन संशयित महिलांच्या सातत्याने संपर्कात होती आणि पेपर फुटीसंदर्भात त्यांच्यात व्हॉट्सॲपवर अनेकदा सविस्तर चर्चा देखील झाली होती.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि सीबीआयचा छापा
तपासादरम्यान सीबीआयच्या हाती कोणतेही पुरावे लागू नयेत, यासाठी मनीषाने आपल्या मोबाईलमधील सर्व संशयास्पद व्हॉट्सॲप चॅट्स आणि डेटा अत्यंत चलाखीने डिलीट केला होता. मात्र, सीबीआयचे सायबर तज्ज्ञ आता हा डिलीट झालेला डेटा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. गुन्ह्याचा सुगावा लागताच सीबीआयच्या पथकाने मनीषा हवालदारच्या घरावर छापा टाकला होता. या कारवाईत भौतिकशास्त्राच्या अनेक मूळ आणि संशयित प्रश्नपत्रिका, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि ६० हजार रुपयांची रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.