AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा

Tukaram Mundhe Action On Milk Adulteration: तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आणि सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
| Updated on: Aug 24, 2026 | 2:39 PM
Share

Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आणि सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. एकामागोमाग एक धाडी पडायला सुरुवात झाल्या. आता यातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्रातील बाजारपेठेतून रोजचे किमान 20 लाख लिटर दूध अचानक गायब होत आहे. या दुधाची रोजची किंमत आठ कोटी तर महिन्याची तब्बल 240 कोटी रुपये इतकी आहे. अचानक गायब होणारे हे दूध भेसळ व रसायनयुक्त असल्याचे एएफडीएच्या धाडीत निषपन्न झाले. कृत्रिम पद्धतीने दूध कसे तयार केले जाते? त्यात कोणती रसायने मिसळजी जातात? स्लो पॉयझन असलेल्या रसायनांचा काय परिणाम होतो?  आता असे अनेक प्रश्न पडले आहेत. तर एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कृत्रिम दूध कसे तयार केले जाते?

कृत्रिम दूध कसे तयार केले जाते?

जे दूध नैसर्गिक असते त्या दुधात पाणी, फॅट, प्रोटीन्स (केसीन), लॅक्टोज (साखर) व खनिजे असतात. कृत्रिम दुधात या घटकांची रसायने वापरली जातात. पाणी कृत्रिम दुधाचा मुख्य भाग आहे, त्यात आधी दुधाचा विरहित घनपदार्थ व नायट्रोजन मिसळले जाते. हे दोन्ही नैसर्गिक दुधासारखी दिसण्यासाठी युरिया किंवा अमोनियम सल्फेट यात मिसळले जाते.

या दुधातील फॅटसाठी यात अतिशय हलक्या दर्जाचे रिफाइंड तेल, व्हेजिटेबल ऑइल किंवा डालडा अथवा पामतेल मिसळले जाते. पाणी व तेल एकत्र मिसळू न शकल्याने त्यात डिटर्जंट पावडरही टाकली जाते. डिटर्जंटमुळे तेल व पाणी एकमेकांत मिसळल्याने दुधासारखे दाट व पांढरे फेसाळ दिसते, नैसर्गिक दुधाप्रमाणे पांढरा रंग, दाटपणा आणण्यासाठी त्यात स्टार्च, मैदा, लिक्विड पॅराफिन किंवा ब्लॉटिंग पेपरचे पाणी मिसळतात. दुधाला नैसर्गिक गोडवा आणण्यासाठी त्यात हलकीशी ग्लुकोज पावडरही मिसळली जाते.

नैसर्गिक दूध आणि कृत्रिम दूध ओळखायचे कसे ?

लाकूड, काच किंवा फरशीच्या गुळगुळीत पृष्ठभागावर दुधाचा एक थेंब टाका. तो पृष्ठभाग थोडासा तिरपा करा. नैसर्गिक दूध हळूहळू खाली सरकते आणि पांढरी रेषा/डाग मागे सोडते. भेसळयुक्त दूध पटकन खाली वाहून जाते आणि डाग सोडत नाही.

Follow Us
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त...पंतप्रधान मोदींचं नाव घेत नेता...
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त... पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!