मोदींची वाघावर मन की बात आणि मुंबईत नवा पाहुणा!

मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कात नव्या पाहुण्याचं (वाघाचं) आगमन झालं आहे.

मोदींची वाघावर मन की बात आणि मुंबईत नवा पाहुणा!
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 12:15 PM

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यावर्षीची शेवटची मन की बात केली. या मन की बातमध्ये मोदींनी वाघ आणि बिबट्यांटा संदर्भ देत त्यांची संख्या वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. योगायोगाने मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कात नव्या पाहुण्याचं (वाघाचं) आगमन झालं आहे. (New tiger arrives at Sanjay Gandhi National Park)

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नव्या वाघाचे आगमन होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा वनक्षेत्रात बंदिस्त करण्यात आलेल्या आणि त्यानंतर गोरेवाडा येथील वन्यप्राणी बचाव केंद्रामध्ये ठेवण्यात आलेल्या आरटी-1 या सात वर्षे वयाच्या वाघाला काल नॅशनल पार्क मध्ये आणण्यात आले.

आरटी-1 वाघाने मुंबईच्या राजीव गांधी नॅशनल पार्कात येण्यासाठी तीन दिवस सलग प्रवास केला. त्यामुळे सध्या वाघ विलगिकरणात आहे. कोरोनाचा धोका होऊ नये म्हणून त्याला विलगीकरमात ठेवण्यात आल्याचं पार्क प्रशासनाने सांगितलं.

27 ऑक्टोबरला चंद्रपूरमधील राजुरा येथे हा वाघ पकडण्यात आला होता. त्याला पकडण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून प्रयत्न सुरू होते. ऑक्टोबरमध्ये त्याला पकडण्यात वन विभागाला यश आले होते. 2019 पासून त्याने 8 नागरिकांना ठार मारले तर तिघांना जखमी केलं होतं. सध्या नॅशनल पार्कमध्ये पाच वाघिणी आणि सुलतान हा पाच वर्षांचा नर वाघ आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या वर्षातील देशवासियांशी शेवटची मन की बात केली. यावेळी त्यांनी वाघ आणि बिबट्यांची संख्या वाढत असल्याबद्दल समाधान व्य्त केलं. मोदी म्हणाले, “देशात वाघांच्या आणि बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मध्य प्रदेशात बिबट्यांची संख्येत वाढत आहे. तसंच महाराष्ट्र देखील बिबट्यांच्या संख्येत तिसऱ्या स्थानावर आहे. मागील काळात वाघांची संख्या कमी होत होती. परंतु आता वाघ-बिबट्यांची संख्या वाढते आहे ही समाधान देणारी गोष्ट आहे”. (New tiger arrives at Sanjay Gandhi National Park)

हे ही वाचा

नवीन वर्षात काय? मोदी देश सांभाळतील तर लोकांनी कुटुंब सांभाळावे, राऊतांची टोलेबाजी

Ind Vs Aus : अजिंक्य रहाणे- मराठमोळा झुंजार सेनापती

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.