AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजप, शिवसेना संघर्ष वाढला, निलेश राणेंच्या त्या व्हिडीओने राज्यभरात खळबळ

भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संबंध आता आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे. निलेश राणे यांनी एक व्हिडीओ जारी करत गंभीर आरोप केले आहेत, निलेश राणे यांच्या या आरोपानंतर आता राज्यात खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! भाजप, शिवसेना संघर्ष वाढला, निलेश राणेंच्या त्या व्हिडीओने राज्यभरात खळबळ
निलेश राणे Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2025 | 7:58 PM
Share

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं जोरदार वारं वाहत आहे, येत्या दोन डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारला देखील रंगत आली आहे, दरम्यान अनेक ठिकाणी यावेळी शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमने-सामने असल्याचं पहायला मिळत आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा हीच परिस्थिती आहे. आता मालवणमधून मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

मालवणमध्ये मतदारांना पैसे वाटले जात असल्याची तक्रार होती, त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी आता थेट एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकत स्टिंग ऑपरेशन केलं आहे.  निलेश राणे यांना या भाजप कार्यकर्त्याच्या घरामध्ये पैशांची बॅग आढळून आली आहे. त्यानंतर निलेश राणे हे अधिक आक्रमक झाले आहेत, त्यांनी या सर्व प्रकाराचा व्हिडीओ देखील काढला आहे. एवढंच नाही तर आणखी पैशांच्या तीन ते चार बॅगा असल्याचा दावा देखील निलेश राणे यांनी केला आहे. या व्हिडीओमुळे राज्यात खळबळ उडाली असून, आता शिवसेना शिंदे गट आणि भाजपातील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान दुसरीकडे मात्र हे पैसे आपल्या व्यावसायाचे असल्याचा दावा या भाजप पदाधिकाऱ्याकडून करण्यात आला आहे, तसेच भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील निलेश राणे यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. ही माहिती खोटी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच निवडणूक अधिकारी आणि पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.  निलेश राणे यांनी थेट या भाजप कार्यकर्त्याच्या घरात घुसून हा व्हिडीओ काढला आहे.  निवडणुकीसाठी पैसे वाटले जात असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. मात्र दुसरीकडे या कार्यकर्त्याने  आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.  हे आपल्या बिझनेसचे पैसे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...