आधी राज ठाकरेंच्या शब्दाखातर आंदोलन सोडलं, नदीच्या स्वच्छतेसाठी कल्याणकराचं पुन्हा आंदोलनाचं हत्यार

नितीन निकम हे नदी पात्रत आंदोलनास बसले आहेत. जोपर्यंत नदी स्वच्छ केली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार, अशी भूमिका निकम यांनी घेतली (Nitin Nikam protest for Ulhas river cleaning).

आधी राज ठाकरेंच्या शब्दाखातर आंदोलन सोडलं, नदीच्या स्वच्छतेसाठी कल्याणकराचं पुन्हा आंदोलनाचं हत्यार
| Updated on: Feb 10, 2021 | 7:02 PM

कल्याण (ठाणे) : लाखो नागरीकांची तहान भागविणारी उल्हास नदी प्रदूषित झाली आहे. नाल्याचे सांडपाणी आणि जलपर्णीमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही नदी वाचविण्यासाठी ‘मी कल्याणकर’ या समाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम हे नदी पात्रत आंदोलनास बसले आहेत. जोपर्यंत नदी स्वच्छ केली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार, अशी भूमिका निकम यांनी घेतली (Nitin Nikam protest for Ulhas river cleaning).

विशेष म्हणजे नितीन निकम यांनी याआधी दोन वेळा नदीच्या स्वच्छतेसाठी आंदोलन छोडले होते. यापैकी एकावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शब्दाखातर त्यांनी आंदोलन सोडलं होतं. मात्र, यावेळी काहीही झालं तरी माघार घेतली जाणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. नदीच्या स्वच्छतेसाठी जोपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

उल्हास नदी ही बारमाही नदी आहे. ही नदी कर्जतपासून कल्याण मोहने बंधाऱ्यापर्यंत प्रदूषित आहे. या नदीच्या पात्रात सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जात आहे. त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. नदी प्रदूषित झाल्याने सांडपाण्यामुळे नदीच्या पात्रात जलपर्णी साचली आहे. ही जलपर्णी पाणी शोषते. या पाण्याला घाण वास येतो.

नदी पात्रत मोहने, गाळेगाव आणि म्हारळ येथील नाल्याचे सांडपाणी सोडले जात आहे. हे नाले बंद करण्यात यावे. नदीचे प्रदूषण रोखले जावे, यासाठी मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी आजपासून नदीपात्रत आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या आंदोलनात माजी नगरसेवक उमेश बारेगावकर, कैलास शिंदे हे ही सहभागी होणार आहेत (Nitin Nikam protest for Ulhas river cleaning).