Sudhir Mungantiwar: राष्ट्रवादीसोबत नव्हे, तर शिवसेनेसोबत जाणे ही चूक होती; सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं विधान

| Updated on: Apr 28, 2022 | 4:28 PM

Sudhir Mungantiwar: सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे मोठं विधान केलं.

Sudhir Mungantiwar: राष्ट्रवादीसोबत नव्हे, तर शिवसेनेसोबत जाणे ही चूक होती; सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं विधान
राष्ट्रवादीसोबत नव्हे, तर शिवसेनेसोबत जाणे ही चूक होती; सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं विधान
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

चंद्रपूर: शिवसेनेसोबत (shivsena) युती करण्यावरून भाजप नेते सुधीर मुनंटीवार (sudhir mungantiwar) यांनी मोठं विधान केलं आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत युती करावी असं एका गटाचं म्हणणं होतं. हा गट राष्ट्रवादी काँग्रेससोबत (ncp) युती करण्याच्या बाजूचा होता. मात्र त्यासाठी मित्रपक्ष आणि विचारसाम्य असलेली शिवसेना आपण सोडायची कशी? असा विचार पुढे आला. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा विचार बाजूला सारला गेला. ती आमची चूक होती, असे आता वाटू लागले असून या चुकीतून बोध घेत पुढील निवडणुकीत स्वबळावर विजय मिळवू, असा निर्धार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. मुनगंटीवार यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेने आधीही भाजपमध्ये राष्ट्रवादीसोबत युती करण्याचं घटत होतं का? असा सवालही या निमित्ताने व्यक्त केला जात आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे मोठं विधान केलं. राष्ट्रवादीसोबत युती न करणे, ही चूक होती का? असे विचारता ती चूक नव्हती. शिवसेनेसोबत जाणे, ही चूक झाली, असं मुनगंटीवार म्हणाले. यूपीमध्ये अनधिकृत भोंगे काढायला सुरुवात झाली आहे. मात्र राज्यात भोंगे काढले जात नाहीत, या राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवरही मुनगंटीवार यांनी भाष्य केले. नियमानुसार जे करायला पाहिजे, ते करण्याची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रपती राजवट लावणार नाही

दोन दिवसांपूर्वीच मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत विधान केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलय कधीही बॅक डोअर एन्ट्री करू नका. मोदी देखील राज्यसभेतून येऊ शकले असते. मात्र ते जनतेतून निवडून आले. बॅक डोअर एन्ट्री करणाऱ्यांना फक्त षडयंत्री राजकारण समजतं. जनतेतून निवडून न आल्याने जनतेच्या‌ समस्या त्यांचे प्रश्न काय? लोकहीत काय? यापेक्षा फक्त स्वार्थाचा बाजार कसा करायचा हे त्यांना समजतं. हे दुर्देवी आहे. भारतीय जनता पार्टी राष्ट्रपती राजवट लावेल अस त्यांना वाटत असेल. मात्र भाजप दुसऱ्या मार्गाने राष्ट्रपती राजवट लावणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

नियती व्याजासकट परत करते

या राज्यात भाजपच्या अनेक नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले. बेईमानीच्या आधारावर जन्माला आलेल ‌सरकार आपल्या बेईमानीचा पिच्छा सोडायला तयार नाही. त्यावेळी छगन भुजबळांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली अन् भुजबळांना व्याजासकट अडीच वर्ष जेलमध्ये जाव लागलं. शेवटी नियती आपलं व्याज वापस करते, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.