त्यांनी जाहीर करावं की…, लक्ष्मण हाकेंचं भर पत्रकार परिषदेमध्ये अजितदादांना ओपन चॅलेंज

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे, राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असून, महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

त्यांनी जाहीर करावं की..., लक्ष्मण हाकेंचं भर पत्रकार परिषदेमध्ये अजितदादांना ओपन चॅलेंज
| Edited By: | Updated on: Jul 04, 2025 | 4:13 PM

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.  राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत आहे, महाज्योतीला निधी मिळत नाही,  हा आमचा सवाल आहे. आम्ही आंदोलन केल्यानंतर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी शिवराळ भाषा केली, ज्यांच्या तोंडी यशवंतराव चव्हाण यांचं नावं असतं, त्यांनी शिविगाळ केली असा आरोप यावेळी लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

हाके नेमकं काय म्हणाले? 

लक्ष्मण हाके यांनी आज पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.  राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत आहे, महाज्योतीला निधी मिळत नाही,  हा आमचा सवाल आहे. आम्ही आंदोलन केल्यानंतर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी शिवराळ भाषा केली, ज्यांच्या तोंडी यशवंतराव चव्हाण यांचं नावं असंत त्यांनी शिविगाळ केली. सारथीला किती निधी दिला? महाज्योतीला साधं कार्यालय मिळत नाही, असा आरोप यावेळी हाके यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, अजित पवार यांचं शिक्षण कमी असल्याने त्यांना सोशल जस्टीस आणि मूल्य कळत नाहीत,  अजित पवार यांनी 2 हजार 182 कोटी रुपयांची तरतूद ही कारखान्यांसाठी केली, लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद केली.  अजित पवार हे  महाजातीवादी उपमुख्यमंत्री आहेत. माझी जीभ घसरली अस म्हणता, अजित पवारांची भाषा किती वेळा आणि कशी घसरली ते बघा. कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांची भाषा आधी बघावी, आणि नंतर आम्हा गावगाड्यामधील लोकांची भाषा बघावी असं हाके यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांना संवैधानिक भाषा कळत नाही.  त्यांना धरणाची भाषा कळते, आम्ही 15 दिवसांपासून बोलत आहोत, तेव्हा कोणी दखल घेतली नाही, आता एक शब्द गेला तर आख्खी राष्ट्रवादी कामाला लागली आहे.  अजित पवारांनी जाहीर करावं, की त्यांनी कोणत्या विद्यार्थाचं भलं केलं आहे.  राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला आंदोलन करण्याची वेळ आली, हे पहिल्यांदा घडत आहे का? अजित पवार हे कारखानदारी टोळीचे नेते आहेत.  अजित पवारांनी सारथीच्या मुलांना जो न्याय दिला तोच न्याय महाज्योतीच्या मुलांना द्यावा, एवढीच आमची मागणी असल्याचं हाके यांनी म्हटलं आहे.