महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज्य मागासवर्ग आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश?

| Updated on: Jun 15, 2021 | 9:50 PM

राज्य सरकारकडून ओबीसी आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती करण्यात आलीय. तसा जीआर आज राज्य सरकारकडून काढण्यात आलाय. आयोगावर विविध प्रवर्ग आणि सर्व महसुली विभागाला प्रतिनिधीत्व देण्यात आलं आहे.

महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज्य मागासवर्ग आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर अखेर राज्य सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती करण्यात आलीय. तसा जीआर आज राज्य सरकारकडून काढण्यात आलाय. आयोगावर विविध प्रवर्ग आणि सर्व महसुली विभागाला प्रतिनिधीत्व देण्यात आलं आहे, तशी माहिती सरकारकडून देण्यात आलीय. 4 जानेवारी 2017 रोजी स्थापन करण्यात आलेल्या ओबीसी आयोगावर या सदस्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. (MahaVikas Aghadi government appoints 9 members to OBC commission)

आयोगातील नवनिर्वाचित सदस्यांची नावे

प्राचार्य बबनराव तायवडे
अॅड. चंद्रलाल मेश्राम (माजी न्यायमूर्ती)
अॅड. बालाची किल्लारीकर
प्रा. संजीव सोनावणे
डॉ. गजानन खराटे
डॉ. निलीमा सराप (लखाडे)
प्रा. डॉ. गोविंद काळे
प्रा. लक्ष्मण हाके
ज्योतीराम माना चव्हाण

कोण आहेत बबनराव तायवडे?

  • ओबीसी महासंघ चे राष्ट्रीय अध्यक्ष
  • त्यांनी  धनवटे नेशनल कॉलेज मध्ये प्राचार्य म्हणून काम बघितलं
  • काँग्रेस च्या तिकिटावर  2013 मशे त्यांनी पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवली
  • तायवाडे कॉलेज नावाने त्यांचं कॉलेज आहे
  • काँग्रेस नेते , आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे
  • नागपूर विद्यापीठ सिनेट मेम्बर म्हणून काम पाहिलं

कोण आहेत लक्ष्मण हाके?

  • सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवारी
  • पुणे विद्यापीठातून एम.ए.चं शिक्षण
  • माणदेश ऊसतोड कामगारांसाठी संघर्ष,
  • धनगर समाज आरक्षण लढ्यातील प्रमुख नेते,
  • फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे काम
  • ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष
  • ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष
  • मागील वर्षभरात अनेक ओबीसी मोर्चे आंदोलनात सक्रिय सहभाग
  • पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराजच्या वेशात जाऊन लक्षवेधी आंदोलन

OBC संघटनांचा एल्गार, उद्यापासून महिनाभर आंदोलन

एकीकडे मराठा आरक्षणासाठी उद्या अर्थात 16 जूनपासून मूक मोर्चांना सुरुवात होत असताना, तिकडे ओबीसी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून महिनाभर ओबीसी संघटना आंदोलन करणार आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात होणार आहे. ओबीसी संघटनांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. नाशिकमधील भुजबळ फार्मवर झालेल्या बैठकीत यावर एकमत झालं. ओबीसींचं अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. परवा म्हणजे 17 जून रोजी दुपारी 12 वाजता जिल्ह्याभरात रस्ता रोको आंदोलन करून आंदोलनाला सुरुवात होईल.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रकाश शेंडगेही आक्रमक

राज्यातील तहसील कार्यालयावर 25 तारखेला राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची घोषणा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केलीय. राज्य सरकारनं ओबीसींची जनगणना करावी, अशी मागणी शेंडगे यांनी केलीय. मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली पण अध्यादेश काढण्यात आला नाही. मागासवर्गीय आयोगातील सदस्य राजकीय पक्षाचे असल्याचं समजतं. यात सरकारनं बदल करत नवे सदस्य नेमावेत, अशी मागणीही त्यांनी केलीय.

पदोन्नती आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हा सरकारमधील एका मंत्र्याचा निर्णय आहे, असा आरोपही शेंडगे यांनी केलाय. पदोन्नती आरक्षण रद्द करण्याचा सरकारच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. ओबीसीमध्ये कुणालाही आम्ही वाटेकरु होऊ देणार नाही. संभाजीराजे यांनी घेतलेली भूमिका संशयास्पद आहे. संभाजीराजे सांगत असलेली प्रक्रिया ही ओबीसी समाजातील आरक्षण मराठ्यांना मिळेल अशी आहे. राजे फक्त मराठा समाजाचे असत नाहीत. त्यांनी बहुजनांचा विचार केला पाहिजे. फक्त मराठा आरक्षण नाही तर ओबीसी आणि पदोन्नती आरक्षणाबाबतही भूमिका राजेंनी स्पष्ट करावी, अशी मागणी शेंडगे यांनी केलीय.

इतर बातम्या :

आठवडाभरात प्रतिज्ञापत्र सादर करा, शाळांच्या फी वसुलीच्या मुद्द्यावरुन उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

महाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश

MahaVikas Aghadi government appoints 9 members to OBC commission