MPSC टॉपर झाला झोलर… सुनेत्रा पवारांच्या बैठकीला हजेरी लावणारा अधिकारी 45 लाखांची लाच स्वीकारताना अटक
बीडमध्ये 45 लाख रुपयांची लाच घेताना एका अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. एसीबीच्या पथकाने अधिकाऱ्याच्या घरात सापळा रचला आणि त्यांना अटक केली आहे... अधिकारी आधी सुनेत्रा पवारांच्या बैठकीला उपस्थित होत त्यानंतर त्यांनी लाच स्वीकारली...

बीडमधील एका अधिकाऱ्याला 45 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे… MPSC अधिकारी असलेला हा अधिकारी लोचखोर न घाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी श्रीनिवास लखमावाड याला राहत्या घरी 45 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. श्रीनिवास लखमावाड याने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीला हजेरी लावली, त्यानंतर घरी जाऊन 45 लाखांची लाच स्वीकारली… लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून धडाकेबाज कामगिरी केली. विशेष म्हणजे लाच घेण्याआधी हा अधिकारी उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजर होता..
नेमकं घडलं तरी काय?
सरकारकडून 2025-26 या वर्षासाठी बीड जिल्ह्याला वृक्ष लागवडीसाठी एकूण 3 कोटी 75 लाखांचा निधी मिळाला. निधी वितरणासाठी आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची प्रलंबित वेतनवाढ देण्यासाठी लखमावाडने 12 टक्के कमिशन मागितलं होतं. लखमावाडचा महिन्याचा पगार दीड लाख असताना त्याने 30 पट म्हणजे तब्बल 45 लाखांची लाच मागितली..
सुरुवातीला संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने लाच देण्यास नकार दिला होता, पण लखमवाडने सूडबुद्धीने अधिकाऱ्याची वेतनवाढ रोखली, निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडेपाठवला. वैतागून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शुक्रवारी एसीबीच्या पथकाने बीडमधील श्रीनिवास लखमावाडच्या घरात सापळा रचला
एसीबीचा सापळा, लाचखोर अटकेत
समोर येत असलेल्या माहितीनुसार, लखमवाडने कमिशनचे पैसे देण्यासाठी तक्रारदाराला घरी बोलावले होतं. पैसे स्वीकारताना ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने तोंडावरून हातरुमाल फिरवत घाम पुसण्याचा बहाणा केला. इशारा मिळताच सापळा रचलेल्या एसीबीच्या पथकाने धाड टाकली आणि लखमवाडला 45 लाखांच्या रोख रकमेसह ताब्यातघेतले. एसीबीचे डीवायएसपी हनुमंत शिंदे आणि पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
आधी एमपीएसीत टॉपर, आता झोलर
मिळालेल्या माहितीनुसार, लाचखोर लखमवाड नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी गावचा रहिवासी आहे, नांदेडमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने बी.टेक. केलं. 2016 मध्ये झालेल्या एमपीएसी परीक्षेत ST प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. पण समाजाला प्रामाणिकपणाचे धडे देणाऱ्या अधिकाऱ्यानेच लाचखोरी केल्यानं खळबळ उडाली आहे.
