जळगावातील धक्कादायक घटना, बस रिव्हर्स घेताना वृद्ध महिलेचा चाकाखाली येऊन मृत्यू

जळगाव शहरातील एका बस स्थानकात ही घटना घडली आहे. (Old Lady Died at Jalgaon)

जळगावातील धक्कादायक घटना, बस रिव्हर्स घेताना वृद्ध महिलेचा चाकाखाली येऊन मृत्यू
जळगाव बस डेपो
| Updated on: Feb 19, 2021 | 6:04 PM

जळगाव : बस रिव्हर्स घेत असताना एक वृद्ध महिला चाकाखाली आल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव शहरातील एका बस स्थानकात ही घटना घडली आहे. देवकाबाई नारायण सपकाळे असे या महिलेचे नाव आहे. (Old Lady Died In Bus accident at Jalgaon)

जळगाव शहरातील एका बस स्थानकात सकाळी 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. मनमाड ते भुसावळ ही MH 14 BT 564 क्रमाकांची बस जळगाव बस स्थानकात आली. त्यावेळी देवकाबाई या कानळदा गावाला जाण्यासाठी बसमध्ये चढायला जात होत्या. मात्र त्याचदरम्यान वाहक बस रिव्हर्स घेत होते. यावेळी देवकाबाई या त्या बसच्या मागील चाकाखाली आल्या. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे बस स्थानक परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी बस स्थानकात धाव घेतली. पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी यावेळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर पंचनामा करून पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदणी सुरु करण्यात आली आहे.

मात्र या घटनेने बसस्थानक परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच या महिलेच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होतं आहे. (Old Lady Died In Bus accident at Jalgaon)

संबंधित बातम्या : 

कॉलेजला निघालेली तरुणी कालव्यात मृतावस्थेत, चुलतभावाने गळा दाबून संपवलं

पत्नीसोबत अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीचा जीम मालकावर अ‍ॅसिड हल्ला

पोलीस अधिकाऱ्यांची घरं दरोडेखोरांच्या निशाण्यावर, धुळे डीव्हायएसपींच्या घरातून सहा लाखांचा ऐवज लंपास