AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस अधिकाऱ्यांची घरं दरोडेखोरांच्या निशाण्यावर, धुळे डीव्हायएसपींच्या घरातून सहा लाखांचा ऐवज लंपास

धुळ्यात चोरांची धमक वाढल्याचं चित्र आहे. येथील डीव्हायएसपी यांच्याकडे धाडसी घरफोडी झाली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांची घरं दरोडेखोरांच्या निशाण्यावर, धुळे डीव्हायएसपींच्या घरातून सहा लाखांचा ऐवज लंपास
Dhule Robbery At DYSP House
| Updated on: Feb 18, 2021 | 2:50 PM
Share

धुळे : धुळ्यात चोरांची धमक वाढल्याचं चित्र आहे. येथील डीव्हायएसपी यांच्याकडे धाडसी घरफोडी (Dhule Robbery At DYSP Pradeep Mendale House) झाली आहे. या घटनेत लाखोंचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. आझादनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे, प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्याकडील घरफोडीची अद्याप उकलही झालेली नसताना चोरट्यांनी साक्रीचे डीव्हायएसपी प्रदीप मैंदाळे यांच्याकडे धाडसी घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे (Dhule Robbery At DYSP Pradeep Mendale House).

चोरट्यांनी घरातून दीड लाखांच्या रोकडसह सव्वासहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी साक्री पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

साक्री शहरातील प्रगती नगरातील प्लॉट क्र. 14/01 मध्ये डीव्हायएसपी प्रदीप भीवसन मैराळे हे राहतात. शनिवारपासून त्यांचे घर बंद होते. त्यादरम्यान, चोरट्यांनी थेट त्यांचे घर लक्ष केले. प्रथम घराच्या कंम्पाऊंडच्या गेटचे कुलूप चोरट्यांनी तोडले. त्यानंतर घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

घरातील कपाटाचे लॉक तोडून 35 हजार रुपयांचे सोन्याचे एक तोळ्याचे मणी मंगळपोत, दोन लाख 10 हजार रुपयांचा सहा तोळ्याचा सोन्याचा चपला हार, दोन लाख 10 हजारांच्या सोन्याच्या सहा तोळ्याच्या दोन बांगड्या, 10 हजार 500 रुपयांचे तीन ग्रॅम सोन्याचे लहान मुलांच्या कानातील बाळ्या आणि एक लाख 50 हजारांची रोकड असा एकूण 6 लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मंगळवारी सायंकाळी घरफोडीची घटना उघडकीस आली (Dhule Robbery At DYSP Pradeep Mendale House).

याप्रकरणी डीव्हायएसपी प्रदीप मैराळे यांच्या तक्रारीवरुन साक्री पोलिसात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह पथकाने घटनास्थळी पाहणी केली. तसेच, श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.

Dhule Robbery At DYSP Pradeep Mendale House

संबंधित बातम्या :

एमडी ड्रग आणि परदेशी बनावटीच्या पिस्तुलसह एकाला अटक, नागपूर ड्रग तस्करांचं केंद्र बनतंय?

VIDEO| धक्कादायक! चार तृतीयपंथीयांची वाहतूक पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल

ड्रेसवर सोन्याचे दागिने न शोभल्याने वधूने पर्समध्ये ठेवले, चोरट्यांनी 16 लाखांच्या दागिन्यांसह पर्स पळवली

वर्ध्यात बसस्थानकावर घोळक्यातून मोबाईल चोरणाऱ्या महिलेला अटक, 41 हजारांचे मोबाईल जप्त

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.