एमडी ड्रग आणि परदेशी बनावटीच्या पिस्तुलसह एकाला अटक, नागपूर ड्रग तस्करांचं केंद्र बनतंय?

नागपूर गुन्हे शाखा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एमडी ड्रग आणि परदेशी बनावटीच्या पिस्तुलसह एका आरोपीला अटक केली.

  • सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 19:09 PM, 17 Feb 2021
एमडी ड्रग आणि परदेशी बनावटीच्या पिस्तुलसह एकाला अटक, नागपूर ड्रग तस्करांचं केंद्र बनतंय?
कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या सिंथेटिक ड्रग्जची किंमत synthetic drugs जवळपास सव्वा कोटी इतकी आहे.

नागपूर : नागपूर गुन्हे शाखा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एमडी ड्रग आणि परदेशी बनावटीच्या पिस्तुलसह एका आरोपीला अटक केली. यात संबंधित आरोपीच्या भावाचाही समावेश आहे. तो सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. मागील काही काळापासून उघड होणाऱ्या या घटना बघता आता नागपूर ड्रग तस्करांचं केंद्र बनत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे (Action against accused of drug sale in Nagpur).

राज्याची उप राजधानी नागपुरात एमडी ड्रगची तस्करी वाढत आहे. त्यामुळे नागपूर ड्रग तस्करांच्या निशाण्यावर आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाया बघता असे प्रश्न उपस्थित व्हायला लागले आहेत. पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नरेंद्र नगर परिसरात एका फ्लॅटमध्ये राहणारा आशिष कुतुलवार नावाचा रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडे विदेशी बनावटीचे पिस्तुल होते. तो कुणाला तरी मारण्याच्या तयारीत आहे. यावरून गुन्हे शाखा पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचत त्याला ताब्यात घेतलं.

आरोपीच्या घराची झडती घेतली असता त्याच्याजवळ विदेशी बनावटीचे पिस्तुल, 3 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली. सोबतच 62 ग्रॅम एमडी ड्रग सुद्धा ताब्यात घेण्यात आले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 6 लाख 20 हजार रुपये एवढी आहे. त्याला अटक करून चौकशी केली असता त्याने पिस्तुल आपल्या भावचं असल्याचं सांगितलं. त्याचा भाऊ सुद्धा कुख्यात गुन्हेगार असून या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एक भाऊ अटक झाला असून पोलीस दुसऱ्याचाही शोध घेत आहेत, अशी माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी पोलीस निरिक्षक सार्थक नेहते यांनी दिली.

नागपूर शहरात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात या कारवाया सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी देखील दोन आरोपींना ड्रग आणि पिस्तुलसह अटक करण्यात आलं होतं. त्यामुळे ड्रग तस्करी आणि शस्त्र पुरवठा करणारी टोळी नागपुरात कार्यरत तर नाही ना असा प्रश्न विचारला जातो आहे.

हेही वाचा :

Drugs Case : सुशांत सिंग प्रकरणी एनसीबीला आणखी एक यश, महत्त्वाचा आरोपी अटकेत

एनसीबीची मोठी कारवाई, मुंबईतील ड्रग माफिया ‘मिनी दाऊद’ला अटक

पतीच्या उपचारासाठी तांत्रिकाकडे धावा, कोल्‍ड ड्र‍िंकमधून नशेचं औषध देत महिलेवर बलात्कार

व्हिडीओ पाहा :

Action against accused of drug sale in Nagpur