AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एनसीबीची मोठी कारवाई, मुंबईतील ड्रग माफिया ‘मिनी दाऊद’ला अटक

एनसीबीने ड्रग्ज रॅकेट प्रकरणी मोठी कारवाई केलीय. मुंबईतील ड्रग माफिया आणि ' मिनी दाउद' आरिफ भुजवाला याला एनसीबीने अटक केली.

एनसीबीची मोठी कारवाई, मुंबईतील ड्रग माफिया 'मिनी दाऊद'ला अटक
| Updated on: Jan 25, 2021 | 11:49 PM
Share

मुंबई : एनसीबीने ड्रग्ज रॅकेट प्रकरणी मोठी कारवाई केलीय. मुंबईतील ड्रग माफिया आणि ‘ मिनी दाउद’ आरिफ भुजवाला याला एनसीबीने अटक केली. दक्षिण मुंबईच्या डोंगरी परिसरात एनसीबीच्या छापेमारीदरम्यान आरिफ भुजवाला पळून गेला होता. अखेर पोलिसांनी आरिफ भुजवाच्या मुसक्या आवळल्या. भुजवाला याच्या ड्रग्स लॅबचा आणि फॅक्टरीचा पर्दाफाश झाल्यानंतरच मुंबईतल्या ड्रग्स माफियांचं अंडरवर्ल्डशी असलेलं कनेक्शन उघडकीस आलं होतं. त्यामुळे आरिफ भुजवालाच्या अटकेनंतर ड्रग्सच्या दुनियेतील अनेक माफिया सुद्धा एनसीबीच्या रडारवर आले आहेत (NCB arrest drugs mafia Mini Dawood Arif Bhujwala in Mumbai).

दिसायला साधारण पण त्याला बघून कोणालाही वाटणर नाही की हा माणुस ड्रग्सच्या दुनियेतला अत्यंत मोठा मोहरा असू शकतो. हाच तो आरिफ भुजवाला आहे. आठवड्याभरापूर्वी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने मुंबईतील डॉन करीम लालाचा नातू चिंकू पठाणला नवी मुंबईतील घणसोली येथून अटक केली. पठाणच्या चौकशीत आरिफ भुजवालाचं नाव समोर आलं आणि त्यानंतर एनसीबीने एक पथक तयार करून डोंगरीतल्या आरिफ भुजवालाच्या नूर मंजिल या इमारतीवर छापा टाकला.

यानंतर ड्रग्सच्या दुनियेतल्या एक मोठ्या माफियाचा पर्दाफाश झाला. आरिफने त्याच्या घरीच ड्रग्स बनवण्याची फॅक्टरी तयार केली होती. तिथून तो भारतासह इतर अनेक देशांमध्ये ड्रग्स पुरवत होता. छापेमारी दरम्यान भुजवाला याच्या घरातून 2 कोटी 18 लाख रुपये आणि तब्बल 12 किलो वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स मिळून आले. मात्र, आरिफने छापेमारी दरम्यान लपून खिडकीतून उडी मारली आणि फरार झाला.

आरिफ हा दुबईमधला ड्रग्स माफिया आणि डॉन कैलास राजपुतच्या थेट संपर्कात

यानंतर एनसीबीने आरिफविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली. गेल्या 4 दिवसांपासून एनसीबीचे पथक भूजवालाच्या शोधात होतं. अखेर आज रायगड जिल्ह्यातील माणगावात तो सापडला. त्यामुळे एनसीबीला मोठं यश मिळालंय. आरिफ हा दुबईमधला ड्रग्स माफिया आणि डॉन कैलास राजपुतच्या थेट संपर्कात असल्याचं एनसीबीच्या तपासात स्पष्ट झालंय.

भुजवालाची गेल्या 5 वर्षात ड्रग्स विकून कोट्यावधींची कमाई

भुजवालाच्या परदेशवारीचे रेकॉर्ड तपासले असता तो दोन वेळा दुबईत जाऊन कैलास राजपुतला भेटला असल्याचं एनसीबीने म्हटलंय. आरिफ भुजवाला याने गेल्या 5 वर्षात ड्रग्स विकून कोट्यावधी रुपयांची संपत्ती जमवलीय आणि ती बायकोच्या नावावर केलीय. त्याचबरोबर कोट्यावधींची रक्कम अंडरवर्ल्ड नेटवर्कला दिलीय. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने आरिफ भुजवाला याची संपत्ती जप्त करायला सुरुवात केलीय.

भुजवालाच्या 4 आलिशान गाड्या आणि 2 मोटारसायकल जप्त, डोंगरीतील घरही सील

आतापर्यंत भुजवालाच्या 4 आलिशान गाड्या आणि 2 मोटारसायकल जप्त करून डोंगरीतल्या त्याच्या घराला सील करण्यात आलं. आरीफच्या अटकेनंतर दाऊदच्या ड्रग्सच्या साम्राज्याला मोठा हादरा बसलाय. मात्र त्याच्या चौकशीत अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे. दुबईत लपलेल्या कैलास राजपूतविरोधात पुरावे मिळताच त्याच्याविरोधात नवा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच एनसीबी येणाऱ्या काळात त्याचाही शोध घेणार आहे. त्यामुळे मुंबईसह परदेशात असलेली ड्रग्सचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी एनसीबी प्रयत्नशील असल्याचं दिसतंय.

हेही वाचा :

दाऊदच्या डोंगरीत घुसून धडक कारवाई, एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ

नागपूर शहर ड्रग्ज तस्करीचा नवा अड्डा?, नागपुरात पुन्हा ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश

ड्रग्ज प्रकरणी दीया मिर्झाच्या माजी मॅनेजरसह करण सजनानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

व्हिडीओ पाहा :

NCB arrest drugs mafia Mini Dawood Arif Bhujwala in Mumbai

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.