AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीच्या उपचारासाठी तांत्रिकाकडे धावा, कोल्‍ड ड्र‍िंकमधून नशेचं औषध देत महिलेवर बलात्कार

तांत्रिकाकडून आपल्या पतीचा उपचार करुन घेणाऱ्या महिलेवर संबंधित तांत्रिकानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पतीच्या उपचारासाठी तांत्रिकाकडे धावा, कोल्‍ड ड्र‍िंकमधून नशेचं औषध देत महिलेवर बलात्कार
| Updated on: Jan 06, 2021 | 8:50 PM
Share

भोपाळ : तांत्रिकाकडून आपल्या पतीचा उपचार करुन घेणाऱ्या महिलेवर संबंधित तांत्रिकानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार मध्य प्रदेशमधील इंदोर येथे घडला. पीडित महिलेच्या पतीला अर्धांगवायूचा आजार होता. त्यावरच उपचार करण्यासाठी ही महिला तांत्रिकाकडे आली होती. मात्र, आरोपीने तिला कोल्ड ड्रिंगमधून नशेचं औषध दिलं आणि बलात्कार केला (Tantric baba rape a women on the name of husband treatment by giving cold drinks with drugs).

विशेष म्हणजे आरोपी तांत्रिक इथंच थांबला नाही. त्याने पीडितेच्या पतीला आणखी आजारी करण्याची आणि मुलांचा बळी देण्याची धमकी देत या महिलेवर पुन्हा घरी येऊन बलात्कार केला. अखेर पीडित महिलेने तांत्रिकाच्या धमक्या आणि शाररीक शोषण याला कंटाळून पोलिसांकडे तक्रार केली.

इंदोरमधील द्वारकापुरी पोलीस स्टेशनने 32 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरुन बाबा कपाली उर्फ निर्मल निवासी पालदा याच्याविरोधात बलात्कार आणि इतर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. पीडितेने पोलिसांना सांगितलं, “माझ्या पतीला अर्धांगवायूचा झटका आलेला होता. त्यामुळे त्यांना हालचालीही करणं शक्य नव्हतं. मला हा तांत्रिक यावर उपचार करत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मी पतीला त्याच्याकडे घेऊन गेले. तांत्रिकाने सुरुवातीला काही इलाज केला आणि त्याचा पतीला फायदा झाल्याचं दिसलं. त्यामुळे या तांत्रिकावर विश्वास बसला.”

“मात्र, नंतर या तांत्रिकाने मला एका खोलीत नेऊन तेथे कोल्ड ड्रिंकमध्ये काही नशेची औषधं पाजली आणि बलात्कार केला. यानंतर ही गोष्ट कुणाला सांगितली तर पतीला आणखी आजारी करेल आणि मुलांचा बळी चढवेल अशी धमकी दिली. तांत्रिकांच्या धमक्यांना घाबरून सुरुवातीला मी याबद्दल कुणालाही सांगितलं नाही. याचा गैरफायदा घेत तांत्रिकाने बरेच दिवस घरी येऊन शारीरिक शोषण केलं,” असंही या पीडितेने नमूद केलंय.

अखेर पीडित महिलेने या शोषणाला कंटाळून आपल्या नातेवाईकांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर या तांत्रिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असं आश्वासन दिलंय. इंदोर पश्‍च‍िमचे पोलीस अधिकारी (एएसपी) प्रशांत चौबे म्हणाले, “ही घटना 2 महिन्यांपूर्वीची आहे. महिलेने तक्रार केल्यानंतर याचा तपास सुरु आहे. आरोपी आधीच दुसऱ्या एका प्रकरणात तुरुंगात आहे. त्याला या प्रकरणी ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल.”

हेही वाचा :

ग्रामपंचायतीचा ठराव, बलात्कार पीडिता हद्दपार; बीडमधील अजब प्रकार

अडीच वर्षाच्या चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या, जामिनावर सुटलेल्या आरोपीचं दुष्कृत्य

ख्रिसमस आणि न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी मुंबईत आलेल्या मुलीवर बलात्कार, नराधमाला 12 तासांत बेड्या

Tantric baba rape a women on the name of husband treatment by giving cold drinks with drugs

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.