AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ख्रिसमस आणि न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी मुंबईत आलेल्या मुलीवर बलात्कार, नराधमाला 12 तासांत बेड्या

ख्रिसमस आणि न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी छत्तीसगडहून मुंबईला आलेल्या एका मुलीवर पनवेलमध्ये एका रिक्षा चालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ख्रिसमस आणि न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी मुंबईत आलेल्या मुलीवर बलात्कार, नराधमाला 12 तासांत बेड्या
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Dec 29, 2020 | 5:23 PM
Share

नवी मुंबई : ख्रिसमस आणि न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी छत्तीसगडहून मुंबईला आलेल्या एका मुलीवर पनवेलमध्ये एका रिक्षा चालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी रिक्षाचालकाने पीडित मुलीला डोक्यात दगड टाकण्याची धमकी देत अत्याचार केला. ही घटना पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत कोळीवाडा स्मशानभुमीच्या बाजूला घडली. विशेष म्हणजे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या 12 तासांमध्ये आरोपी नराधमाला बेड्या ठोकल्या (Rape on a girl come to mumbai for new year celebration).

पीडित मुलगी छत्तीसगडमधील जसपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती नाताळ आणि नव वर्ष साजरं करण्यासाठी आली होती. ती आधी झारखंडवरुन दिल्ली येथे आली होती. तेथे तिने एक दिवस हॉटेलमध्ये राहून पश्चिम एक्सप्रेसमधून 22 डिसेंबर 2020 रोजी वांद्रा रेल्वे स्टेशन येथे आली. या ठिकाणी एकटं असल्याचं पाहून रेल्वे टीसीने तिला चाईल्ड हेल्प लाईनच्या ताब्यात दिलं. तेथे त्यांनी तिला सखी सेंटरमध्ये दाखल केलं. या ठिकाणाहून तिची चौकशी करुन तिला सोडुन देण्यात आलं.

26 डिसेंबर 2020 रोजी पीडित मुलगी सकाळी पनवेल रेल्वे स्टेशन येथे आली. या ठिकाणी तिची शिवा नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. ती त्याच्यासोबत राहिली. 27 डिसेंबर 2020 रोजी पीडित मुलीने पनवेल रेल्वस्टेशन येथे एका रिक्षाला हात दाखवून गांधी गार्डनला सोडण्यास सांगितले. या रिक्षा चालकाने असता पीडितेला सांगितलेल्या ठिकाणी घेऊन न जाता वडघर नदीच्या काठाजवळील स्मशानभूमीच्या बाजूला झाडांमध्ये नेले. तेथे आरोपी रिक्षा चालकाने बाजूला पडलेला दगड पीडित मुलीच्या अंगावर उगारुन तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि बलात्कार केला.

पीडितेवर बलात्कारानंतर आरोपी रिक्षा चालक घटनास्थळावरुन फरार झाला. या प्रकरणी पीडितेने तक्रार नोंदवल्यानंतर पनवेल पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची सूत्रं फिरवली. पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास केला. पोलिसांनी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासातून तपास केला. तसेच पीडित मुलगी ज्या रेल्वस्टेशन परिसरातून रिक्षात बसली तेथील सर्व रिक्षा चालक, झोपडपट्टी, रहिवाशी सोसायट्या आणि व्यावसायिक आस्थापना यांच्याकडेही चौकशी करण्यात आली.

अखेर ही चौकशी सुरु असतानाच संशयित रिक्षाबाबतत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरुन पुढे तपास सुरु करुन सदर आरोपी सचिन लालताप्रसाद शर्मा याला पनवेलमधील बारवाई गावातून रिक्षासह अटक करण्यात आलं. या गुन्ह्यात आरोपीबाबत कोणताही मागमूस नसताना पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या या कारवाईबाबत नागरिकांमधूनही समाधान व्यक्त केलं जातंय. पोलीस आयुक्त बीपिन कुमार सिंह आणि उपायुक्त शिवराज पाटील यांनीही तपास पथकाचं कौतुक केलं आहे.

हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त बीपिन कुमार सिंह, पोलीस सहआयुक्त डॉ. जय जाधव, अपर पोलीस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र गिड्डे यांनी विशेष प्रयत्न केले.

हेही वाचा :

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांवर मॉडेलचा बलात्कार केल्याचा आरोप, महिला आयोगाचं महाराष्ट्र पोलिसांना पत्र

झारखंडमध्ये नवऱ्यासमोर पत्नीचा 17 जणांकडून बलात्कार, महिला आयोगाने अहवाल मागवला

महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना आता फाशीची सजा? वाचा दिशा कायद्याचा मसुदा

Rape on a girl come to mumbai for new year celebration

मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.