क्रशर मशीनवर कामासाठी जात होते तरुण; दुचाकीच्या समोरासमोरील धडकेत दोघांचाही घात झाला

| Updated on: Mar 28, 2023 | 8:56 AM

एक दुचाकी आष्टीकडून गोंडपिपरीकडे जात होती. दुसरी गोंडपिपरीकडून आष्टीकडे येत होती. या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

क्रशर मशीनवर कामासाठी जात होते तरुण; दुचाकीच्या समोरासमोरील धडकेत दोघांचाही घात झाला
Follow us on

चंद्रपूर : एक दुचाकी आष्टीकडून गोंडपिपरीकडे जात होती. दुसरी गोंडपिपरीकडून आष्टीकडे येत होती. या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार राजगुरू, प्रशांत नेताम, गणेश पोदाळी घटनास्थळी पोहचले. दोन युवक जागीच ठार झाले होते. तर तिसरा जखमी झाला होता. राकेश अधिकारी आणि अमोल नेताम अशी मृतकांची नावं आहेत. तर नितेश कोवे हा युवक जखमी झाला. जखमीला गोंडपिंपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोन दुचाकींची समोरासमोर धडक

जिल्ह्यातील गोंडपिपरी-आष्टी मार्गावर विठ्ठलवाडा येथे भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. गडचिरोली जिल्ह्यातील गुंडापली येथे क्रशर मशीनवर कामासाठी जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनाची जबर धडक बसली.

हे सुद्धा वाचा

हे दोन युवक ठार

यात सावली तालुक्यातील बेलगटा येथील अमोल नेताम आणि चामोर्शी तालुक्यातील राकेश अधिकारी हे जागीच ठार झाले. अपघातात नितेश कोवे हा युवक जखमी झाला आहे. घटनेची माहिती गोंडपिपरी पोलिसांना होताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी हजर झाले. जखमीला गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ठाणेदार राजगुरू तपास करत आहेत.

मशीनवर कामासाठी जाताना अपघात

दोन युवक क्रशर मशीनवर काम करण्यासाठी जात होते. त्यावर त्यांचे कुटुंब चालत होते. पण, युवकाच्या मृत्यूने त्याचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे. कुटुंबाचा भार आता घरचे लोकं कसे सांभाळणार असा प्रश्न पडला आहे. ही घटना दुपारी एकच्या दरम्यानची आहे.

घटनेनंतर गर्दी झाली. त्यापैकी कुणीतरी पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना पंचनामा केला. दोन जण ठार झाले होते. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कळवले. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.