अमरावती जिल्हा बँकेचा वाद विकोपाला, प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून घर पेटवण्याचा प्रयत्न, काँग्रेस नेत्याचा आरोप

| Updated on: Oct 07, 2021 | 4:37 PM

अमरावती जिल्हा बँक निवडणुकीचा वाद विकोपाला पोहोचला आहे. काँग्रेस नेते व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर प्रहार कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचं समोर आलं आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनीच हल्ला करायला लावल्याचा आरोप वीरेंद्र जगताप यांनी केला आहे.

अमरावती जिल्हा बँकेचा वाद विकोपाला, प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून घर पेटवण्याचा प्रयत्न, काँग्रेस नेत्याचा आरोप
Amravati Bank issue
Follow us on

अमरावती: अमरावती जिल्हा बँक निवडणुकीचा वाद विकोपाला पोहोचला आहे. काँग्रेस नेते व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या घरावर प्रहार कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचं समोर आलं आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनीच हल्ला करायला लावल्याचा आरोप वीरेंद्र जगताप यांनी केला आहे. चांदूर रेल्वेत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

बच्चू कडू पराभवाचा राग काढत आहेत

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या परिवर्तन पॅनलचा जिल्हा बँक निवडणुकीत पराभव झाल्यानं ते राग काढत आहेत, असा आरोप काँग्रेस नेते वीरेंद्र जगताप यांनी केला आहे.माझ्यावर हल्ला करून घर पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केला आहे. चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात काँग्रेस आमदार बळवंत वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. चांदुर रेल्वेत पोलिसांनी या घटनमुळे फौजफाटा वाढवला होता.

अमरावती जिल्हा बँकेत यशोमती ठाकूर यांची सत्ता

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाले. या निकालात पालकमंत्री यशोमती ठाकूर व काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या सहकार पॅनलने बाजी मारत 21 पैकी 13 जागांवर विजय मिळवत बँकेत आपली सत्ता अबाधित ठेवलेली आहे. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत सातशे कोटी गुंतवणूक प्रकरणी सव्वातीन कोटी रुपयांची दलाली खाल्ल्याचा आरोप करण्यात आला होता. बँकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा प्रचार परिवर्तन पॅनलने सातत्याने केला होता. मात्र, सहकार पॅनलं विजय मिळवला होता.

सत्ता अजून स्थापन व्हायचीय

सहकार पॅनलला13 जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता अजून स्थापन व्हायची आहे.राजकारणात कधीही गुणाकार बेरीज होऊ शकते, असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बँकेतील पुढील राजकारण कसे असेल याचे संकेत दिले आहेत. बँकेत पुढच्या काळात गैव्यवहार होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेऊ, असे देखील राज्यमंत्री बचू कडू यांनी सांगितले होते.

सहकार पॅनल शेतकऱ्यांसाठी काम करणार

अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख व उत्तरा जगताप यांच्या वर ED ने नोटीस बजावल्या आहेत असे आरोप करण्यात आले. मात्र, विरोधकांचे सर्व आरोप नाकारत मतदाराणी आम्हाला निवडून दिले आहे. बँकेत कोणताही भ्रष्टाचार झाला नाही पालकमंत्री यशोमती ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली आमचे पॅनल शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे,असं माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले.

इतर बातम्या:

Special Report | अमरावतीत DCC बँक निवडणूक निकालानंतर खिसेकापूमुळं राडा!

Amravati DCC Bank election : यशोमती ठाकूर यांची हॅट्रिक; मात्र ‘सत्ता अजून स्थापन व्हायचीय’, बच्चू कडू नवा डाव टाकणार?

Amaravati District Co Operative Bank Election Congress Prahar party workers clashes continue