अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, पोलीस शिपाई म्हणून काम करणाऱ्याची ‘फॉरेन डेप्युटेशन म्हणून सेवा

| Updated on: Jul 04, 2021 | 11:20 AM

विकास अंजिकर यांना तीन वर्षासाठी 'फॉरेन डेप्युटेशन' वर पाठविण्यात येणार आहे. सध्या संपूर्ण पोलीस वर्तुळात त्याचे कौतुक केलं जातं आहे. (Amravati Rural Police Constable will be sent on Foreign Deputation)

अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, पोलीस शिपाई म्हणून काम करणाऱ्याची फॉरेन डेप्युटेशन म्हणून सेवा
Amravati Rural Police Force peon Foreign Deputation
Follow us on

अमरावती : महाराष्ट्र पोलीस दलात सेवा करणारे अनेक अधिकारी विदेशात जाऊन सेवा करत असल्याचे आपण ऐकलं आहे. मात्र एखाद्या पोलीस शिपायाला थेट विदेश सेवेत पाठवले जाणार असल्याचे तुम्ही कधी ऐकलं आहेत का? नाही ना… पण हे खर आहे. अमरावती ग्रामीण पोलीस दलात शिपाई म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला ‘फॉरेन डेप्युटेशन’ वर पाठवण्यात येणार आहे. (Amravati Rural Police Constable will be sent on Foreign Deputation)

तीन वर्षांसाठी ‘फॉरेन डेप्युटेशन’ची सेवा

अमरावती ग्रामीण पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या विकास अंजिकर असे या व्यक्तीचे नाव आहे. विकास अंजिकर याला अधिकार्‍यांप्रमाणेच पोलीस दलातील प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना विदेशात सेवा देण्यासाठी पाठविण्यात येते. याच योजनेअंतर्गत विकास अंजिकर यांना तीन वर्षासाठी ‘फॉरेन डेप्युटेशन’ वर पाठविण्यात येणार आहे. सध्या संपूर्ण पोलीस वर्तुळात त्याचे कौतुक केलं जातं आहे.

आतापर्यंत केलेल्या पोलीस सेवेतील शेरे, सेवा आणि कार्याची माहिती घेऊन शिपायांची या सेवेकरिता नियुक्ती करण्यात येते. याकरिता दिल्ली येथील प्रशिक्षण केंद्रातून कर्मचाऱ्याला ट्रेनिंग देण्यात येते. तसेच मुलाखत घेऊन अंतिम सिलेक्शन होणार आहे. ही नियुक्ती तीन वर्षाकरिता असते.

सिक्युरिटी असिस्टंट’ म्हणून सेवा देणार

अमरावती ग्रामीण पोलीस दलातील शिपाई पुढील तीन वर्ष विदेशात जाऊन ‘सिक्युरिटी असिस्टंट’ म्हणून सेवा देणार आहे. अमरावती पोलिसांच्या वतीने आतापर्यंत तीन पोलीस शिपायांनी विदेशात सेवा दिली आहे. यात दक्षिण आफ्रिका, म्यानमार्गसारख्या देशात जाऊन ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याबाबत जिल्हा अधिक्षक हरि बालाजी यांनी पेढे भरवून आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे.

(Amravati Rural Police Constable will be sent on Foreign Deputation)

संबंधित बातम्या : 

रायगडमधील JNPT बंदरात DRI ची मोठी कारवाई, 879 कोटी रुपयांचं 293 किलो हेरॉईन जप्त

ठाणे मनपाची धडक कारवाई सुरुच, दिवा, वर्तक नगरमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील कर्ज प्रकरण, तीन तत्कालीन अधिकाऱ्यांना अटक