रायगड : रायगड जिल्ह्यातील उरण येथे JNPT बंदरात महसूल गुप्तचर संचलनालयाने (DRI) मोठी कारवाई केलीय. या कारवाईत तब्बल 879 कोटी रुपये किमतीचे 293 किलोग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. हे हेरॉईन इराणमार्गे अफगाणिस्तानमधून जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (JNPT) बंदरात आयात करण्यात आले होते. जप्त केलेले हेरॉईन पंजाबला नेण्यात येणार असल्याचीही माहिती उघड झालीय. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली आहेत (DRI action against smuggling of heroin drugs in JNPT Raigad from Afghanistan).