90 च्या दशकात अंडरवर्ल्डला भिडलेल्या निवृत्त एसीपीचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात अटकेत

संबंधित एसीपीने नव्वदच्या दशकात अंडरवर्ल्डमधील अनेक गुन्हेगारांचा सामना केला होता, मात्र त्यांना आपल्याच मुलाबद्दल माहित नसल्याचा दावा केला जात आहे.

90 च्या दशकात अंडरवर्ल्डला भिडलेल्या निवृत्त एसीपीचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात अटकेत
एनसीबीची धडक कारवाई; चरस, गांजा हस्तगत, पाच आरोपींना अटक
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 3:06 PM

मुंबई : मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्ज प्रकरणात सेवानिवृत्त एसीपीच्या मुलाला अटक केली आहे. रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्याने 90 च्या दशकात अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांशी दोन हात केले होते. गोरेगावमध्ये टाकलेल्या छाप्यानंतर एनसीबीने ही कारवाई केली. (NCB arrested son of retired Maharashtra Police ACP in Drugs Casse)

गोरेगावातील छापेमारीत बेड्या

मुंबई एनसीबीने महाराष्ट्र पोलिसातील सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या (एसीपी) मुलाला ड्रग्ज प्रकरणात बेड्या ठोकल्या आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सोमवारी रात्री गोरेगाव भागात छापा टाकला होता. यावेळी 100 हून अधिक एलएसडी ब्लोट्ससह त्याला अटक करण्यात आली. संबंधित एसीपीने नव्वदच्या दशकात अंडरवर्ल्डमधील अनेक गुन्हेगारांचा सामना केला होता, मात्र त्यांना आपल्याच मुलाबद्दल माहित नसल्याचा दावा केला जात आहे.

अभिनेत्याचा मुलगाही जाळ्यात

प्रख्यात अभिनेते दलिप ताहील (Dalip Tahil) यांच्या मुलाला गेल्या महिन्यात ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून ध्रुव ताहील (Dhruv Tahil) याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. ध्रुव ड्रग पेडलरकडे व्हॉट्सअ‍ॅपवरुन वारंवार अंमली पदार्थांची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे.

ड्रग्जसाठी पैसे दिल्याचंही उघड

ध्रुव ताहील एका ड्रग पेडलर्सच्या संपर्कात होता. तो पेडलरकडून वारंवार ड्रग्जची मागणी करत होता. ड्रग्जसाठी ध्रुवने त्याला पैसे दिल्याचंही उघड झालं आहे. दोघांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगवरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत ध्रुव ताहील याला अटक केली. एनडीपीएस कायद्याअंतर्गत ध्रुवला अटक झाली असून त्याला वांद्रे क्राईम ब्रांचमध्ये ठेवण्यात आले होते.

व्हॉट्सअ‍ॅप संभाषण समोर

35 ग्रॅम एमडी ड्रग्ज प्रकरणात अँटी नार्कोटिक्स सेलकडून 20 एप्रिलला मुजमिल अब्दुल रहमान शेख याला अटक करण्यात आली होती. त्याचा मोबाईल अंमली पदार्थ विरोधी विभागाने ताब्यात घेतला. तेव्हा त्याच्या व्हॉट्सअॅपवर ध्रुव ताहील याच्यासोबतचे संभाषण समोर आले. ध्रुव मुजमिलकडे वारंवार ड्रग्जची मागणी करत होता.

संबंधित बातम्या :

दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरला NCB कडून अटक, तब्बल 200 किलो गांजा जप्त!

ड्रग्ज प्रकरणी चौकशीत समोर आले नाव, NCBची धाड पडताच टीव्ही अभिनेता झाला पसार!

(NCB arrested son of retired Maharashtra Police ACP in Drugs Casse)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.