Chandrapur | चार्जिंग सुरू असताना चंद्रपुरमध्ये ई-बाईकला लागली अचानक आग, बाईक जळून खाक…

चंद्रपुरमधील ई-बाईकला आग लागल्याने एकच चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या ई-बाईकला आग लागल्यानंतर अनेकांनी याचे व्हिडीओ आणि फोटोही घेते, जे आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, या बाईकला आग नेमकी कशामुळे लागली हे अजून स्पष्ट होऊ शकले नाहीयं.

Chandrapur | चार्जिंग सुरू असताना चंद्रपुरमध्ये ई-बाईकला लागली अचानक आग, बाईक जळून खाक...
| Edited By: | Updated on: Aug 04, 2022 | 11:56 AM

चंद्रपुर : चंद्रपुरात (Chandrapur) एक अतिशय धक्कादायक घटना घडलीयं. शहरातील वर्दळीच्या भागात एक ई-बाईक जळून खाक झालीयं. शहरातील गर्दीच्या भागात झालेल्या या घटनेनी चिंता व्यक्त केली जातंय. एका दुकानासमोर चार्जिंगसाठी ही बाईक लावण्यात आली होती. चार्जिंग (Charging) सुरू असतानाच या बाईकला आग लागली. अचानक बाईकने (E-bike) पेट घेतल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. क्षणभरात उंचच-उंच ज्वाला बाईकमधून निघाल्या. प्रसंगावधान राखून आसपासच्या नागरिकांनी अग्निशामक सिलिंडर आणि पाणी बाईकवर टाकले.

चंद्रपुरमधील ई-बाईकला आग लागल्याने एकच चर्चा सुरू

चंद्रपुरमधील ई-बाईकला आग लागल्याने एकच चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या ई-बाईकला आग लागल्यानंतर अनेकांनी याचे व्हिडीओ आणि फोटोही घेते, जे आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, या बाईकला आग नेमकी कशामुळे लागली हे अजून स्पष्ट होऊ शकले नाहीयं. परंतू काही सेकंदात ई-बाईक जळून खाक झालीयं. ई-बाईकबाबत सातत्याने होणाऱ्या आगीच्या घटनांनी चिंता वाढलीयं.

अचानक बाईकने पेट घेतल्याने चांगलाच गोंधळ उडाला

चंद्रपुरात ई- बाईक कापरासारखी जळाल्याची घटना उजेडात आलीयं. शहरातील गर्दीच्या भागात झालेल्या घटनेने चिंता व्यक्त होत आहे. एका दुकानासमोर ही बाईक चार्जिंगला लावली होती. अचानक बाईकने पेट घेतल्याने चांगलाच गोंधळ उडाला आहे. मात्र काही सेकंदात ई-बाईकची राख झाली. ई-बाईकबाबत सातत्याने आगीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळेच वाहनचालक आता ई-बाईक खरेदी करताना विचार करतायेत.