राजा राहणार की जाणार? राजकीय उलथापालथी होतील?; भेंडवळच्या घट मांडणीतील राजकीय भाकीत काय?

| Updated on: Apr 23, 2023 | 8:36 AM

बुलढाण्यात भेंडवळची घट मांडणी करण्यात आली आहे. या घट मांडणीतून राजकीय भाकीत वर्तवण्यात आलं आहे. राजा म्हणजे पंतप्रधान कायम राहील. पण राजा तणावात असेल असं भाकीत या घट मांडणीतून वर्तवण्यात आलं आहे.

राजा राहणार की जाणार? राजकीय उलथापालथी होतील?; भेंडवळच्या घट मांडणीतील राजकीय भाकीत काय?
Bhendwal Ghat Mandani Prediction
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बुलढाणा : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या भेंडवळच्या घट मांडणीचं भाकीत समोर आलं आहे. पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराजांनी हे भाकीत वर्तवलं आहे. यंदाही राज्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. तसेच अतिवृष्टीचा अंदाजही व्यक्त करण्यता आला आहे. पिकपाणी चांगली होणार असली तरी यंदा पेरण्या उशिरा होणार असल्याचंही भाकीत वर्तवण्यात आलं आहे. या घट मांडणीतर राजकीय परिस्थितीवर भाष्य करणार आहे. राजा राहणार की जाणार? आणि नैसर्गिक आपत्ती येणार का? याचं भाकीतही वर्तण्यात आलं आहे.

भेंडवळ येथे पहाटे 6 वाजता सूर्योदयाच्या वेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घट मांडणीचे निरीक्षण करून यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे. राजकीय परिस्थितीवरही यंदा भाकीत केलं गेलं आहे. यामध्ये देशाचा राजा कायम असणार म्हणजेच पंतप्रधान कायम असतील, असं भाकीत वर्तवण्यात आल आहे. मात्र राजाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. राजा कायम तणावात असेल, असं या घटमांडणीत म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

आर्थिक परिस्थिती ढासळेल

राजकीय उलथापालथ होत राहील. संरक्षण मजबूत राहील. मात्र शेजारील राष्ट्राच्या कुरघोड्या असतील. देशाची आर्थिक परिस्थिती ढासळेल. आर्थिक परिस्थितीत चढउतार होईल, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.मात्र पारावरच्या घट मांडणीत पहिल्यांदाच विंचू निघाल्याने देशात रोगराईची परिस्थिती असणार असे भाकीत यंदा वर्तवण्यात आलं आहे. नैसर्गिक आपत्ती येत राहतील, भूकंपाचं प्रमाण जास्त असेल, असं भाकीतही वर्तवण्यात आलं आहे.

ऑगस्टमध्ये अतिवृष्टी

यंदा महत्त्वाचा मानल्या जाणारी पीक पावसाची परिस्थितीही वर्तवली गेली आहे. पाऊस जून महिन्यामध्ये कमी असेल. जुलैमध्ये साधारण. तर ऑगस्टमध्ये प्रचंड पाऊस पडणार असून अतिवृष्टीची भाकीत वर्तवण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी असेल. मात्र अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. पिकांबाबत केलेल्या भाकितांमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ आणि इतर पिके सर्वसाधारण मोघम स्वरूपाचे पिके सांगण्यात आली आहेत. मात्र उत्पन्न चांगलं असलं तरी अवकाळीने या पिकांना फटका बसणार असल्याचे भाकीत यंदाच्या घट मांडणीमध्ये वर्तवण्यात आल आहे.