भारत केमिकल्स कारखान्यात भीषण स्फोट, 5 जण जखमी, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या स्फोटात पाच कामगार जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.

भारत केमिकल्स कारखान्यात भीषण स्फोट, 5 जण जखमी, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
BHARAT CHEMICAL BLAST
| Edited By: | Updated on: Jul 04, 2021 | 12:22 AM

पालघर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या स्फोटात पाच कामगार जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. या सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आहे आहे. (blast taken place in Palghar Bharat Chemicals five labourers injured)

स्फोट झाल्यामुळे पाच जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स या कारखान्यात भीषण स्फोट झाला. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, या घटनेत अचानकपणे स्फोट झाल्यामुळे पाच जण जखमी झाले आहेत.

आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश, 5 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार

कारखान्यात आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियमंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून या घटनेत जखमी झालेल्या 5 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वाडा कोसळल्यामुळे दोन महिला गंभीर जखमी

अशाच प्रकराची एक घटना नाशिमध्ये घडली आहे. नाशिमकमध्ये धनगर गल्ली येथे संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास वैश्य वाडा अचानकपणे खाली कोसळला. या दुर्घटनेत दोन महिला गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. या दोन्ही महिला खाली सुरू असलेल्या खोदकामाच्या खोल खड्ड्यात पडल्या. हा प्रकार समोर आल्यानंतर अग्निशमन दलाच्या जावानांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी या महिलांना मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले. या महिलांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. तसेच आणखी एका पाच वर्षांचा मुलगा आणि त्याच्या वडिलांनाही बाहेर काढण्यात आलंय.

मिळालेल्या माहितीनुसार वाड्याच्या पाठीमागे एका वाड्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू होतं. त्याचे हादरे बसून वैश्य वाडा कोसळल्याचा प्रार्थमिक अंदाज आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

MPSC उत्तीर्ण, पण दीड वर्षांपासून नोकरी नाही; पुण्यात तरुणाची गळफास घेत आत्महत्या

टिटवाळा आरोपी मिरवणूक प्रकरण, पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या, चौकशी सुरु

हरवलेल्या बहिणींना पुण्यातून शोधलं, गावी आल्यावर लातुरात दोघींचा एकाच घरात गळफास

(blast taken place in Palghar Bharat Chemicals five labourers injured)