हरवलेल्या बहिणींना पुण्यातून शोधलं, गावी आल्यावर लातुरात दोघींचा एकाच घरात गळफास

लातूर शहराजवळच्या हरंगुळ भागात राहणाऱ्या दोन बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही

हरवलेल्या बहिणींना पुण्यातून शोधलं, गावी आल्यावर लातुरात दोघींचा एकाच घरात गळफास
suicide
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 7:21 PM

लातूर : लातूर शहराजवळच्या हरंगुळ भागात राहणाऱ्या दोन बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी पोलीस या आत्महत्येमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. गीतांजली बनसोडे (17 वर्ष) आणि धनश्री क्षीरसागर (20 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या दोन्ही मावस बहिणींचं नाव आहे. (Missing sisters found in Pune, police handed over to their parents, Both committed suicide when they come home)

या बहिणी हरवल्याची तक्रार दोघींच्याही आई-वडिलांनी नुकतीच पोलिसांत दिली होती. त्या नंतर पोलिसांनी या दोघींना पुण्यातून गावी आणून आई-वडिलांच्या स्वाधीन केलं होतं. असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं. त्यानंतर आज या दोघी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या आहेत. पोलीस आता पुढील तपास करीत आहेत.

बायकोची हत्या करुन कपाटात ठेवलं, मुलीला दिवाणाखाली टाकलं, मग स्वत:ही गळफास

पत्नी व मुलीची हत्या करून पतीने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येवदा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भामोद येथे उघडकीस आली आहे. ज्या गावात साधी चोरीचीही घटना सहसा घडत नाही, त्या गावात दुहेरी हत्याकांडासह केलेल्या आत्महत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पत्नी व मुलीच्या मृतदेहाला दुर्गंधी सुटल्याने ही घटना उघडकीस आली. अनिल दिनकरराव देशमुख असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे, तर वंदना अनिल देशमुख व साक्षी अनिल देशमुख असे हत्या झालेल्या पत्नी व मुलीचे नाव आहे.

देशमुख यांच्या घरातून शुक्रवारपासून दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी येवदा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, एका खोलीतील कपाटामध्ये पत्नीचा, तर दिवाणाखाली मुलगी साक्षीचा कुजलेल्या अवस्थेत, तर दुसऱ्या खोलीत अनिलचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

नागरिकांनी अनिल याला नुकतेच गावात पाहिले होते. त्यामुळे त्याने आधी पत्नी व मुलीची हत्या केल्यानंतर रात्री आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मृतक अनिल याच्याकडे लोडींग वाहन होते, परंतु मागील वर्षभरापासून कोरोनामुळे तेदेखील बंद होते. त्यामुळे तो आर्थिक विवंचनेत होता. घटनेचा पुढील तपास येवदा पोलीस करीत आहेत.

इतर बातम्या

मुंबईकरांकडून वसूल केलेले 21 लाख पोलिसानेच लाटले, 8 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या शिपायावर फसवणुकीचा गुन्हा

रात्री गाढ झोपेत असताना अज्ञातांचा हल्ला, 21 वर्षीय तरुणाचा चिरला गळा, बीड हादरलं

(Missing sisters found in Pune, police handed over to their parents, Both committed suicide when they come home)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.