रात्री गाढ झोपेत असताना अज्ञातांचा हल्ला, 21 वर्षीय तरुणाचा चिरला गळा, बीड हादरलं

रात्री गाढ झोपेत असताना एका 21 वर्षीय युवकाचा गळा कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा हल्ला कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रात्री गाढ झोपेत असताना अज्ञातांचा हल्ला, 21 वर्षीय तरुणाचा चिरला गळा, बीड हादरलं
crime photo

बीड : रात्री गाढ झोपेत असताना एका 21 वर्षीय युवकाचा गळा कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा हल्ला कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. नारायण गाडेकर असं जखमी झालेल्या युवकाचं नाव असून ही घटना दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाबळगाव येथे घडली आहे. (unknown person in Beed cuts throat of 21 year young boy case registered)

रात्री झोपेत असताना कापला गळा

मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील बाबूळगाव गावावमध्ये नारायण गाडेकर हा 21 वर्षीय तरुण 2 जून रोजी रात्री गाढ झोपेत होता. यावेळी त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने अचानकपणे हल्ला केला. तसेच या हल्यामध्ये गाडेकर तरुणाचा अज्ञाताने गळा कापला. गळा कापल्यामुळे या हल्ल्यात नारायण गाडेकर हा तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकारमुळे बाबळगाव तसेच पंचक्रोशीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तरुणाचा गळा नेमका कोणी कापला ? याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.

तरुणावर औरंगाबादमध्ये अपचार सुरु

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर नारायण गाडेकर या तरुणाला औरंगाबादमध्ये रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गळा कापल्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

लातूर जिल्ह्यात दोन बहिणींची आत्महत्या

दरम्यान, लातूर शहराजवळच्या हरंगूळ भागात दोन मुलींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मयत मुली आहेत एकमेकांच्या मावस बहिणी आहेत. या बहिणींना आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून धनश्री क्षीरसागर (वय-20) असं आत्महत्या केलेल्या एका मुलीचे नाव आहे. तर दुसरी मुलगी ही अल्पवयीन आहे.

इतर बातम्या :

मोक्कामधील वॉन्टेड आरोपी, नवी मुंबई पोलिसांनी सापळा रचला, आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न, पण बेड्या ठोकल्याच!

VIDEO | कल्याणमध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीची जंगी मिरवणूक, व्हिडीओ व्हायरल

ट्रक चालकाचा ताबा सुटला, ट्रक थेट मेंढ्याच्या कळपात, 12 मेंढ्या चिरडल्या, लाखोंचं नुकसान

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI