VIDEO | कल्याणमध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीची जंगी मिरवणूक, व्हिडीओ व्हायरल

मोक्का अंतर्गत शिक्षा भोगणारा आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(Kalyan accused procession who released on bail Video Viral)

VIDEO | कल्याणमध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीची जंगी मिरवणूक, व्हिडीओ व्हायरल
Kalyan accused procession
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 11:44 AM

कल्याण : मोक्का अंतर्गत शिक्षा भोगणारा आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले. टिटवाळाजवळील वरप गावात या सर्व प्रकार घडला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Kalyan accused procession who released on bail Video Viral)

कल्याणमधील टिटवाळाजवळील वरप गावात हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणमध्ये एक मोक्कातंर्गत शिक्षा भोगणारा आरोपी जेलमधून सुटला. यावेळी त्या आरोपीच्या मित्रांनी त्याची जंगी मिरवणूक काढली. कल्याण वरप परिसरात ही जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत एकच जल्लोष करण्यात आला. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कल्याणमध्ये तिघांना बेदम मारहाण

तर दुसरीकडे कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एका तरुणीने उल्हासनगरहून डोंबिवलीला जाण्यासाठी रिक्षा पकडली. त्या रिक्षातून प्रवास करत असताना तो रिक्षाचालक तिची छेड काढू लागला. यानंतर त्या तरुणीने आपल्या दोन मित्रांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांना तातडीने संबंधित ठिकाणी येण्यास सांगितले. यानंतर तिचे दोन्ही मित्र पोहोचल्यानंतर त्यांचा रिक्षाचालकांशी वाद झाला. मात्र यावेळी इतर जमावाला त्या दोघांसह तरुणीला गावातील काही लोकांनी पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली.

कल्याणमध्ये घडलेल्या दोन्ही घटना निंदनीय

दरम्यान कल्याणमध्ये घडलेल्या दोन्ही घटना निंदनीय असल्याची प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. मी याबाबत पोलिसांशी बोललो आहे. यात जे कोणी आरोपी आहेत, त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे. ही झालेली घटना निंदनीय आहे. त्यांना आजच अटक झाली पाहिजे, अशा सूचना मी केल्या आहेत. त्यांची तक्रार नोंदवून घेतली आहे. सध्या पोलिस मारहाण झालेल्या व्यक्तींचा शोध घेत आहे. हे कोणी आरोपी आहेत. यात जे कोणी असतील त्यांना मोकाट सोडलं जाणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

पाहा व्हिडीओ : 

(Kalyan accused procession who released on bail Video Viral)

संबंधित बातम्या : 

VIDEO | कल्याणमध्ये रिक्षाचालकाकडून तरुणीची छेडछाड, मदतीसाठी पोहोचलेल्या दोघांना जमावाची मारहाण

कोरोना योद्ध्याची भूमिका बजावणाऱ्या होमगार्डचं मानधन थकलं, नाशिकच्या 400 जणांवर आर्थिक संकट

ट्रक चालकाचा ताबा सुटला, ट्रक थेट मेंढ्याच्या कळपात, 12 मेंढ्या चिरडल्या, लाखोंचं नुकसान

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.