कोरोना योद्ध्याची भूमिका बजावणाऱ्या होमगार्डचं मानधन थकलं, नाशिकच्या 400 जणांवर आर्थिक संकट

नाशिक जिल्ह्यात कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून करणाऱ्या 400 होम गार्डचं मानधन थकल्याची माहिती आहे. मानधन थकल्यानं होमगार्डसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

कोरोना योद्ध्याची भूमिका बजावणाऱ्या होमगार्डचं मानधन थकलं, नाशिकच्या 400 जणांवर आर्थिक संकट
होम गार्ड
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 11:06 AM

नाशिक: मार्च 2020 पासून भारतावर कोरोना विषाणू संसर्गाचं संकट आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी देशात पहिल्या लाटेत देशपातळीवर लॉकडाऊन करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र सरकारनं ब्रेक द चैनचे निर्बंध लागू केले. लॉकडाऊनच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांनी समर्थपणे पार पाडली. तर, या काळात गृहरक्षक दलाचे जवान म्हणजेच होमगार्ड यांनी देखील पोलिसांबरोबर बंदोबस्ताचं काम केलं आहे. मात्र, कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या नाशिक येथील होम गार्डचं मानधन थकल्याचं समोर आलं आहे. (Nashik Home Guard remuneration pending more than one month facing trouble)

नेमकं प्रकरण काय?

नाशिक जिल्ह्यात कोव्हिड योद्धे म्हणून काम करणाऱ्या होमगार्डसचे मानधन थकले आहे. जिल्ह्यातील जवळपास 400 होमगार्डसचे मानधन थकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे 52 दिवसांचे मानधन थकले आहे.

होमगार्ड यांच्यावर आर्थिक संकट

पोलिसांसोबत कोरोना काळात कायदा सुव्यवस्थेसाठी होमगार्डसंनी रस्त्यावर उभे राहून जबाबदारी पार पाडली आहे. मात्र, मानधन थकल्यानं जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या होमगार्डसवर उपासमारीची वेळ आलीय.

नाशिक स्मार्ट सिटीचा कारभार सुमंत मोरे यांच्याकडं

नाशिक स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल आणि लोक प्रतिनिधी यांच्यामध्ये संघर्ष होत होता. त्यामुळे नाशिकच्या नगरसेवकांनी प्रकाश थविल यांची बदली करावी, अशी मागणी केली होती. राज्याचे सचिव सीतारम कुंटे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत प्रकाश थविल यांची बदली करण्यात आली आहे. आता सुमंत मोरे नाशिक स्मार्ट सिटीचे नवीन सीईओ असतील. थविल यांची बदली प्रशासकीय बाब असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी नगरसेवकांच्या रेट्या पुढे स्मार्ट सिटी प्रशासन झुकलं असल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या

ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात, छगन भुजबळ यांचं वक्तव्य

तिसरी लाट तिशीच्या आतील तरुणांसाठी धोकादायक; टास्क फोर्सच्या हवाल्याने अजित पवारांचा इशारा

(Nashik Home Guard remuneration pending more than one month facing trouble)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.