तिसरी लाट तिशीच्या आतील तरुणांसाठी धोकादायक; टास्क फोर्सच्या हवाल्याने अजित पवारांचा इशारा

अजित पवार आज नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत हा इशारा दिला. (Ajit Pawar)

तिसरी लाट तिशीच्या आतील तरुणांसाठी धोकादायक; टास्क फोर्सच्या हवाल्याने अजित पवारांचा इशारा
अजित पवार

नाशिक: कोरोनाची तिसरी लाट आली तर ती तिशीच्या आतील तरुणांसाठी धोकादायक असेल, असं टास्क फोर्सने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सावध राहा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. (corona third wave dangerous for age 30, says Ajit Pawar)

अजित पवार आज नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत हा इशारा दिला. सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. असं संकट यापूर्वी कधीच आलं नव्हतं, असं सांगतानाच आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट आली तर 30 वयोगटातील आतील लोकांना अधिक धोका असेल असं टास्क फोर्सने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून जिल्ह्यातच ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असं पवार यांनी सांगितलं.

दोन महिन्यात 70 टक्के लसीकरण करणार

कोरोनाच्या पहिल्या लाटेत 60 वर्षांवरील लोक बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेत 30 ते 60 वयोगटातील लोकांना कोरोनाची बाधा झाली होती, असं ते म्हणाले. येत्या दोन महिन्यात 70 टक्के लसीकरण करण्याचं ठाकरे सरकारचं टार्गेट आहे. मात्र, एवढ्या लस नाहीत. तरीही आम्ही हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. कोरोना कामात निधीची कमतरता भासू नयेत असा आमचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

50 टक्के पेरण्या

अजित पवार यांनी कृषी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचं सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 50 टक्के पेरण्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे चांगला पाऊस आल्यावरच पेरण्या करा. नाही तर दुबार पेरणीचं संकट ओढवेल, असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला. राज्यात खतांची कमतरता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोरोना काळात जीडीपी राखण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं असल्याचं ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणून प्रमोशन व्हावं का?

दरम्यान, प्रमोशन व्हावं, मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का? असा सवाल अजितदादांना करण्यात आला. अनपेक्षितपणे आलेला हा प्रश्न अजितदादांनी तितक्याच सहजतेने टोलवून लावला. मला प्रमोशन व्हावं असं नाही वाटत, असं त्यांनी बिनदिक्कतपणे सांगितलं. बरं हे सांगतानाच आपल्या विधानाचं समर्थन करणारं उदाहरणही दिलं. तुम्हीही पत्रकार आहात. तुम्हालाही आपण संपादक व्हावं वाटतं. पण सर्वचजण संपादक होत नाही. एकच व्यक्ती संपादक होत असतो. आमच्याकडेही 145 मध्ये एकच माणूस मुख्यमंत्री होतो. तो आम्ही बसवलेला आहे. तोही पाच वर्षासाठी बसवला आहे. त्यामुळे पाच वर्षे याचा विचारच करायचा नाही, असं अजितदादांनी सांगताच एकच हशा पिकला. (corona third wave dangerous for age 30, says Ajit Pawar)

 

संबंधित बातम्या:

Breaking : गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं सोलापुरचं कार्यालय फोडलं

VIDEO: ठाकरे सरकारच्या अस्तित्वाची ‘तुंबळ लढाई’ सुरु? राऊतांना दिल्लीत का ‘महाभारत’ आठवतंय?; वाचा सविस्तर

मुख्यमंत्रीपदी प्रमोशन मिळावं असं वाटत नाही का? असं विचारताच अजितदादा म्हणाले…

(corona third wave dangerous for age 30, says Ajit Pawar)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI