Breaking : गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं सोलापुरचं कार्यालय फोडलं

पडळकर समर्थकांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. एकच छंद, गोपीचंद अशा घोषणा देत, पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली.

Breaking : गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं सोलापुरचं कार्यालय फोडलं
गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय फोडलं
रोहित पाटील

| Edited By: सागर जोशी

Jul 01, 2021 | 6:39 PM

सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानंतर त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. कारण गोपीचंद पडळकर समर्थकांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. एकच छंद, गोपीचंद अशा घोषणा देत, पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली. पडळकर समर्थकांनी राष्ट्रवादीच्या सोलापुरातील कार्यलायवर हल्ला चढवला. (MLA Gopichand Padalkar’s activists attack NCP office in Solapur)

पडळकरांवरील हल्ल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्या प्रकरणात दोन अज्ञात आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांच्या महितीनुसार या दोन्ही आरोपींची ओळख पटली असून पोलीस पथकामार्फत त्यांचे शोध कार्य सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्याने गाडीवर दगडफेक केली तो 25 वर्षांचा तरुण आहे. त्याचे शिक्षण बीए पर्यंत पूर्ण झालेले आहे. सोलापुरातील एका शाळेत लॅब असिस्टंट म्हणून काम करतो.

हा तरुण स्वतः धनगर समाजातून असून समाजातील विविध प्रश्नांवर त्याने याआधी आवाज उचलला असल्याची माहिती आहे. मागील वर्षी याच सरकारच्या विरोधात त्याने मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन केल्याची माहिती देखील पुढे येत आहे. मात्र गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला करण्यामागे नेमके काय कारण असेल हे अटकेनंतर समजेल.

दगडफेकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

दगडफेकीच्या घटनेनंतर आता आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 10 ते 15 जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पडळकर यांनी प्रतिप्रश्न करताना पुणे आणि पंढरपुरात हजारोंची गर्दी करणारे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पडळकर यांनी केलीय. याबाबत विचारलं असता कायदा हातात घेण्याचं कारण नाही. ज्यांनी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलीय. ते नाशिकमध्ये खरिप हंगामाच्या आढावा बैठकीसाठी आले होते. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.

‘हिंमत असेल तर अजितदादांवर गुन्हा दाखल करा’

सोलापुरात संचारबंद लागू असतानाही आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर पोलिसांनी भांदवि कलम 188, 336, 269 नुसार गुन्हा दाखल केलाय. पडळकर यांच्यासह 10 ते 15 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर पडळकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर जरुर करा. पण मग हिंमत असेल तर पुण्यात हजारोंची गर्दी जमा करणाऱ्या अजित पवारांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय.

संबंधित बातम्या :

पडळकर म्हणाले, रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात, आता रोहित पवारांचं जशास तसं उत्तर

आधी गाडीवर हल्ला, आता गोपीचंद पडळकरांवर गुन्हा, पडळकर म्हणतात, अजित पवारांना का सोडलं?

MLA Gopichand Padalkar’s activists attack NCP office in Solapur

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें