AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय, मुद्यावरून गुद्द्यावर आली, पडळकरांचा पुन्हा हल्लाबोल

माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय. मुद्द्यांची बात करणारी राष्ट्रवादी गुद्द्यांवर आलीय, असा घणाघात आज सकाळीदेखील पडळकरांनी राष्ट्रवादीवर केला. दगडफेकीच्या घटनेनंतर सकाळी पडळकर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्यांनी आजही राष्ट्रवादीला लक्ष्य केलं.

माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय, मुद्यावरून गुद्द्यावर आली, पडळकरांचा पुन्हा हल्लाबोल
गोपीचंद पडळकर
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jul 01, 2021 | 8:13 AM
Share

सोलापूर :  “माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय. मुद्द्यांची बात करणारी राष्ट्रवादी गुद्द्यांवर आलीय. राष्ट्रवादीचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. बहुजनांवर अन्याय करणारे हे लोक आहेत. माझं शरद पवारांना आव्हान आहे की त्यांनी सांगावं, मुद्यावर बोलत असताना डोक्यात दगड घालायचं हे कोणत्या कलमात लिहलं आहे”, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला आहे. (MLC Gopichand Padalkar Criticized Sharad Pawar NCP After Car Attacked)

पडळकरांकडून राष्ट्रवादी पुन्हा टार्गेट

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी रात्री दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीला गर्भित इशारा देताना दगडच काय गोळी घातली तरी मी शांत बसणार नाही, असा पवित्रा पडळकर यांनी घेतला आहे. दगडफेकीनंतर आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला लक्ष्य केलं.

मी बोललेलं इतकं वाईट वाटत असेल तर तुम्ही मोदींवर का बोलता?

“मी शरद पवारांवर काय टीका केली होती… मग मी बोललेलं इतकं वाईट वाटत असेल तर तुम्ही मोदींवर का बोलता?”, असा प्रतिप्रश्न पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला. माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. बहुजनांना जागं करण्याचा माझा प्रयत्न आहे, असं पडळकर म्हणाले.

फडणवीस दरेकर यांचे फोन आले

विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे असं सांगताना मुद्द्यांवर बोला म्हणणारी राष्ट्रवादी आता गुद्द्यांवर का आली, असा सवाल पडळकर यांनी विचारला. दगडफेकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी विचारपूस करण्यासाठी फोन केल्याचं पडळकर यांनी सांगितलं.

माझा आवाज कुणी दाबू शकत नाही

“अजित पवारांनी काही आरक्षण घालवलं. ओबीसींचं आरक्षण यांच्या नाकर्तेपणामुळे गेलं, असा आरोप पडळकर यांनी केला. तसंच बहुजनांना जागं करण्याचं काम मी करत आहे. माझं हे काम मी थांबवणार नाही. माझा आवाज कुणी दाबू शकत नाही”, असंही पडळकर म्हणाले.

त्यांनी हल्ला केला, आपण विचारांची लढाई विचारांनी लढू

“जरी माझ्या गाडीवर हल्ला झाला असेल तरी माझं आमच्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की आपण विचारांची लढाई विचारांनी लढू”, असं पडळकर म्हणाले. सोलापूरची पत्रकार परिषद आटपून पडळकर जालन्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.

(MLC Gopichand Padalkar Criticized Sharad Pawar NCP After Car Attacked)

हे ही वाचा :

Breaking : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक

तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, निलेश राणेंचा इशारा

Follow Us
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी