तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, निलेश राणेंचा इशारा

तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, असा इशाराच निलेश राणे यांनी दिला आहे. (BJP Nilesh Rane tweet Gopichand Padalkar Car Attacked)

तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, निलेश राणेंचा इशारा
निलेश राणे

मुंबई : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर बुधवारी सोलापुरात दगडफेक झाली. ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी पडळकर सोलापुरात आले होते. त्यावेळी गोपीचंद पडळकर ताफ्यावर दगडफेड झाल्याची घटना घडलीय. घटनेनंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, असा इशाराच निलेश राणे यांनी दिला आहे. (BJP Nilesh Rane tweet Gopichand Padalkar Car Attacked)

काय म्हणाले निलेश राणे?

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठा पराक्रम केला तर एवढं समजून चला जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, असा गर्भित इशारा देत तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, अशी धमकीच निलेश राणेंनी दिली आहे.

‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज’ अशी घोषणा देत गाडीवर दगडफेक

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा कॅमेरात कैद झाला आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशी घोषणा देत गाडीवर भला मोठा दगड टाकून संबंधिताने तिथून पळ काढला. पडळकर समर्थकांनी मोटारसायकलवर पाठलाग केल्यानंतर सुद्धा दगडफेक करणारा हाती लागला नाही. सोलापुरातील श्रीशैल्य नगर अक्क महादेवी मंदिर येथे ही घटना घडली.

सकाळी शरद पवारांवर टीका, संध्याकाळी गाडीवर दगडफेक

“शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे” अशी जहरी टीका पडळकर यांनी बुधवारी सकाळी केली. सोलापुरात बोलताना त्यांनी पत्रकार परिषदेत पवारांवर हल्ला चढवला. तसंच पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी होत असलेल्या बैठकीवर त्यांनी शेलक्या शब्दात लक्ष्य केलं. रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात, अशा शब्दात पडळकर पवारांवर तुटून पडले.

‘आज दगडफेक, उद्या गोळा मारतील पण मी मागे हटणार नाही’

“महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला माहिती आहे की या घटनेमागे नेमकं कोण असेल. मी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जे गोरगरिबांच्या बाजूने बोलत आहे. गोरगरिबांची बाजू मांडत आहे. इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात भूमिका मांडत आहे. ती आता या लोकांना आवडली नसेल. ते जे गप्पा मारत आहेत लोकशाहीच्या, फुले-शाहू-आंबेडकरांच्या, त्यांचं हेच उत्तर आहे का? वैचारिक लढाई तर विचाराने चाला. पण अशाप्रकारे उत्तर देणार असतील तर मी कधी गप्प बसणार नाही. आज दगडं फेकून मारले आहेत, उद्या गोळ्या घालतील. पण तरी मी माझी भूमिका मांडणं सोडणार नाही”, अशी भूमिका पडळकर यांनी दगडफेक घटनेनंतर टीव्ही 9 शी बोलताना मांडली.

(BJP Nilesh Rane tweet Gopichand Padalkar Car Attacked)

हे ही वाचा :

Breaking : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI