VIDEO | कल्याणमध्ये रिक्षाचालकाकडून तरुणीची छेडछाड, मदतीसाठी पोहोचलेल्या दोघांना जमावाची मारहाण

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 03, 2021 | 10:07 AM

कल्याणमध्ये दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. (Kalyan mob beating two person with girl)

VIDEO | कल्याणमध्ये रिक्षाचालकाकडून तरुणीची छेडछाड, मदतीसाठी पोहोचलेल्या दोघांना जमावाची मारहाण
Kalyan mob beating two person with girl

Follow us on

कल्याण : कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणमध्ये दोन तरुण आणि एका तरुणीला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Kalyan young woman was molested by a rickshaw mob beat up two person who reached for help)

नेमकं प्रकरण काय?

एका तरुणीने उल्हासनगरहून डोंबिवलीला जाण्यासाठी रिक्षा पकडली. त्या रिक्षातून प्रवास करत असताना तो रिक्षाचालक तिची छेड काढू लागला. यानंतर त्या तरुणीने आपल्या दोन मित्रांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांना तातडीने संबंधित ठिकाणी येण्यास सांगितले. यानंतर तिचे दोन्ही मित्र पोहोचल्यानंतर त्यांचा रिक्षाचालकांशी वाद झाला. मात्र यावेळी इतर जमावाला त्या दोघांसह तरुणीला गावातील काही लोकांनी पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली.

अद्याप गुन्हा दाखल नाही

सध्या या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कल्याण पश्चिमेकडील कोळसेवाडी पारिसरात काटेमानीवली नाक्यावर भररस्त्यात हा प्रकार घडला. याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला आहे की नाही, याची काहीही माहिती मिळालेली नाही.

पाहा व्हिडीओ :

(Kalyan young woman was molested by a rickshaw mob beat up two person who reached for help)

संबंधित बातम्या : 

ठाणे महापालिकेची धडक कारवाई सुरुच, दिवा भागात अनधिकृत बांधकामांवर हातोडा

कोरोना लस घेण्यासाठी जाणाऱ्या शिक्षिकेची दुचाकी खड्ड्यात अडकली, उपचारादरम्यान मृत्यू

पालघर जिल्ह्याला लागलेला कुपोषणाचा विळखा कायम, दोन महिन्यात 40 बालक, 5 मातांचा मृत्यू, प्रशासन साखर झोपेतच!

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI