कोरोना लस घेण्यासाठी जाणाऱ्या शिक्षिकेची दुचाकी खड्ड्यात अडकली, उपचारादरम्यान मृत्यू

कोरोना लस घेण्यासाठी गेलेल्या एक शिक्षिकेचा खड्ड्यामुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे. कल्याण पश्चिमेकडे ही घटना घडली. (Kalyan teacher went to get corona vaccine has died in accident due to potholes)

कोरोना लस घेण्यासाठी जाणाऱ्या शिक्षिकेची दुचाकी खड्ड्यात अडकली, उपचारादरम्यान मृत्यू
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 7:01 AM

कल्याण : राज्यात सध्या कोरोना लसीकरण मोहिम जोरदार पद्धतीने राबवली जात आहे. कोरोना लस घेण्यासाठी गेलेल्या एक शिक्षिकेचा खड्ड्यामुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे. कल्याण पश्चिमेकडे ही घटना घडली. ही शिक्षिका आपल्या स्कूटीवरुन जात असताना हा सर्व प्रकार घडला आहे. (Kalyan teacher went to get corona vaccine has died in accident due to potholes)

नेमकं प्रकरण काय? 

कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरात हाय प्रोफाईल रितू कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्समध्ये राहुल कटारिया आपल्या पत्नी दिव्या आणि कुटुंबियांसोबत राहतात. राहुल आणि दिव्या हे दोघेही शिक्षक आहेत. दिव्या या अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवत होती.

दिव्या यांना 23 जूनला कोरोनाची लस घ्यायचे होते. त्यामुळे ती तिचा दीर अर्जुन कटारियासोबत लस घेण्यासाठी निघाली. पण लस घेण्यासाठी जात असताना तिच्या स्कूटीमध्ये पेट्रोल कमी आहे, असे तिच्या लक्षात आले. त्यानंतर अर्जुन हा आपल्या वहिनीसोबत पेट्रोल भरण्यासाठी बापगाव येथील पेट्रोल पंपावर जात असताने त्यांनी एका ट्रकला ओव्हरटेक केलं.

रुग्णालयात 4 दिवस उपचार 

यानंतर ट्रकच्या पुढे आल्यानंतर काही अंतरावरील रस्त्यावर पाण्याने भरलेला एक खड्डा होता. त्यात खड्ड्यात गाडी अडकल्याने त्यांची स्कूटी स्लिप झाली. या घटनेत दिव्या गंभीर जखमी झाली. यानंतर दिव्या यांना खासगी रुग्णालयात 4 दिवस उपचार सुरु होते. मात्र दिव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती दिव्याचे दीर अर्जुन कटारिया यांना टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. या घटनेबाबत कोणतीही पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

(Kalyan teacher went to get corona vaccine has died in accident due to potholes)

 संबंधित बातम्या : 

अंबरनाथ पालिकेची मोठी मोहीम, रस्ता मोकळा करण्यासाठी 14 टपऱ्या, अनधिकृत दुकांनावर केली कारवाई

गणेशोत्सव साध्या पद्धतीत साजरी करा, मूर्तीच्या उंचीवरही मर्यादा, ठाणे महापालिका आयुक्तांकडून गाईडलाईन्स जारी

भिवंडी पोलिसांची जबरदस्त कामगिरी, घरफोडी, दरोड्याच्या प्रकरणातील 9 आरोपी अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Non Stop LIVE Update
‘लाडकी बहीण’च्या अर्जास उशीर, काळजी करू नका कारण... दादांची मोठी घोषणा
‘लाडकी बहीण’च्या अर्जास उशीर, काळजी करू नका कारण... दादांची मोठी घोषणा.
पवारांचा सर्वपक्षीय बैठकीला खोडा, बारामतीत फोन अन्...; भुजबळांचा आरोप
पवारांचा सर्वपक्षीय बैठकीला खोडा, बारामतीत फोन अन्...; भुजबळांचा आरोप.
ब्रेक फेल कंटेनरची 6-7 वाहनांना धडक अन् कंटनेर नाल्यात झाला पलटी
ब्रेक फेल कंटेनरची 6-7 वाहनांना धडक अन् कंटनेर नाल्यात झाला पलटी.
जरांगे या भुताला बाटलीत बंद करून समुद्रात फेका, कुणी केली खोचक टीका?
जरांगे या भुताला बाटलीत बंद करून समुद्रात फेका, कुणी केली खोचक टीका?.
मान्सून पिकनिकला लोणावळ्यातील भुशी डॅमवर जाताय? तर थोडं थांबा, कारण...
मान्सून पिकनिकला लोणावळ्यातील भुशी डॅमवर जाताय? तर थोडं थांबा, कारण....
अनंत अंबानीचं लग्नात 54 कोटींचं घड्याळ, शाहरुखसह मित्रांना कोटींची भेट
अनंत अंबानीचं लग्नात 54 कोटींचं घड्याळ, शाहरुखसह मित्रांना कोटींची भेट.
'जगबुडी'नं ओलांडली धोक्याची पातळी, पाणी पुलावर, खेड-दापोली मार्ग बंद
'जगबुडी'नं ओलांडली धोक्याची पातळी, पाणी पुलावर, खेड-दापोली मार्ग बंद.
विशालगडावर अज्ञातांकडून दगडफेक, नेमकं काय घडलं? स्थानिकांचा आरोप काय?
विशालगडावर अज्ञातांकडून दगडफेक, नेमकं काय घडलं? स्थानिकांचा आरोप काय?.
खान्देशी गाण्यांवर झुंबा... ZP शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल
खान्देशी गाण्यांवर झुंबा... ZP शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल.
भिवंडीत पावसाची संततधार, 'या' भागात गुडघाभर पाणी अन् रस्त्याची नदी
भिवंडीत पावसाची संततधार, 'या' भागात गुडघाभर पाणी अन् रस्त्याची नदी.