AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेशोत्सव साध्या पद्धतीत साजरी करा, मूर्तीच्या उंचीवरही मर्यादा, ठाणे महापालिका आयुक्तांकडून गाईडलाईन्स जारी

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे (Thane municipal commissioner vipin sharma issued guidelines of ganeshotsav).

गणेशोत्सव साध्या पद्धतीत साजरी करा, मूर्तीच्या उंचीवरही मर्यादा, ठाणे महापालिका आयुक्तांकडून गाईडलाईन्स जारी
चतुर्थीला चंद्र दिसल्यानंतर भगवान श्रीकृष्णांवरही लागला होता चोरीचा आरोप
| Edited By: | Updated on: Jun 30, 2021 | 6:41 PM
Share

ठाणे : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ठाणेकरांनी देखील गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. दरम्यान याबाबत महापालिकेच्यावतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत (Thane municipal commissioner vipin sharma issued guidelines of ganeshotsav).

गणेशोत्सवासाठी नेमक्या मार्गदर्शक सूचना काय?

1) या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी करू नये. श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरीता 4 फूट आणि घरगुती गणपतीकरिता 2 फुटांच्या मर्यादेत ठेवावी (Thane municipal commissioner vipin sharma issued guidelines of ganeshotsav).

2) यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम स्थळी विसर्जन करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

3) उत्सवाकरीता वर्गणी किंवा देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा.

4) जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच आरोग्य विषयक आणि सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

5) सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे ( उदा.रक्तदान ) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यावर भर देण्याचे आवाहनदेखील महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

6) शासनाकडून लागू करण्यात आलेले ‘लेवल ऑफ रेस्ट्रीकेशन फॉर ब्रेकिंग द चेन’ (Level of Restriction for Breaking the Chain) बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमीत्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही.

7) आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे आणि तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

8) श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट आणि फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्याच्या सूचना देखील महापालिकेच्यावतीने करण्यात आल्या आहेत.

9) गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरिक अंतराचे (फिजीकल डिस्टन्सींग ) तसेच स्वच्छतेचे नियम ( मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

10) श्रींच्या आगमन आणि विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे.

11) लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.

हेही वाचा : आमदार गीता जैन यांच्या नावे फेक WhatsApp नंबर, स्थानिकांकडे पैशांची मागणी

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.