अंबरनाथ पालिकेची मोठी मोहीम, रस्ता मोकळा करण्यासाठी 14 टपऱ्या, अनधिकृत दुकांनावर केली कारवाई

अंबरनाथ पालिकेनं अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत आज अंबरनाथ पश्चिमेच्या कोहोजगाव दर्गा भागातील अनेक अनधिकृत टपऱ्या हटवण्यात आल्या.

अंबरनाथ पालिकेची मोठी मोहीम, रस्ता मोकळा करण्यासाठी 14 टपऱ्या, अनधिकृत दुकांनावर केली कारवाई
AMBARNATH ACTION

ठाणे : अंबरनाथ पालिकेनं अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत आज अंबरनाथ पश्चिमेच्या कोहोजगाव दर्गा भागातील अनेक अनधिकृत टपऱ्या हटवण्यात आल्या. तसेच यावेळी अंबरनाथ पालिकेतर्फे एकूण 13 ते 14 टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. (Ambernath Municipality started action against unauthorized tapari and shops removed total 14 shops today)

13 ते 14 शेड्स, अनधिकृत टपऱ्या तोडल्या

मिळालेल्या माहितीनुसार कोहोजगाव दर्गा परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात अनधिकृत टपऱ्या आणि शेड्स टाकून दुकानं सुरु करण्यात आली होती. या सर्वांवर आज अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. यामध्ये जवळपास 13 ते 14 शेड्स, अनधिकृत टपऱ्या तोडण्यात आल्या. त्यामुळे अनेक वर्षांनी या रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

टपऱ्या तोडल्यामुळे रस्ता मोठा आणि प्रशस्त झाला

अंबरनाथ पालिकेचं अग्निशमन केंद्र आता कोहोजगाव परिसरात स्थलांतरित करण्यात आलं असून अग्निशमन दलाच्या गाड्यांना येण्या-जाण्यासाठी हाच रस्ता वापरावा लागणार आहे. मात्र असलेल्या अतिक्रमणांमुळे हा रस्ता अरुंद झाला होता. तसेच जागोजागी टपऱ्या टाकल्यामुळे येथे ट्रॅफिकचीसुद्धा समस्या वाढली होती. त्यामुळे आता अनधिकृत दुकानं आणि टपऱ्या तोडल्यामुळे रस्ता मोठा आणि प्रशस्त झाला आहे.

टपऱ्या उभ्या राहणार नाहीत, याची काळजी घेणं गरजेचं

दरम्यान, अंबरनाथ पालिकेने केलेल्या कारवाईचे येथील स्थानिक नागरिक तसेच वाहनधारकांनी स्वागत केले आहे. या कारवाईमुळे रस्त्यावरील रहदारी कमी होण्यास मदत होईल, अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली. मात्र, असे असले तरी स्थानिक भूमाफियांच्या वरदहस्ताने या टपऱ्या पुन्हा बसवल्या जातात. त्यामुळे अशा टपऱ्या उभ्या राहणार नाहीत, याची काळजी घेणं गरजेचं असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

पालघर जिल्ह्याला लागलेला कुपोषणाचा विळखा कायम, दोन महिन्यात 40 बालक, 5 मातांचा मृत्यू, प्रशासन साखर झोपेतच!

आरारारा… खतरनाक!!! Cylinder Man सागर जाधवला प्रवीण तरडेंकडून चित्रपटात संधीचं आश्वासन

ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागातून धक्कादायक फोन, शिक्षकाला केलं जिवंतपणीच मृत घोषित

(Ambernath Municipality started action against unauthorized tapari and shops removed total 14 shops today)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI