चंद्रपुरात उभारले कृत्रिम फुफ्फूस, प्रदूषणाच्या परिणामाचा अभ्यास होणार

| Updated on: Nov 17, 2021 | 3:43 PM

चंद्रपुरातील या कृत्रिम फुफ्फुसात हवेतील प्रदूषणाचे कण जातील. त्याचा परिणाम त्या फुफ्फुसावर पडणार आहे. तो काळा पडत जाण्याची शक्यता आहे. हा परिणाम किती आणि कसा होईल, याचा अभ्यास यातून केला जाणार आहे.

चंद्रपुरात उभारले कृत्रिम फुफ्फूस, प्रदूषणाच्या परिणामाचा अभ्यास होणार
चंद्रपूरच्या मुख्य चौकात लावण्यात आलेले कृत्रिम फुफ्फूस
Follow us on

चंद्रपूर : जिल्हा प्रदूषित म्हणून ओळखला जातो. या प्रदूषणाचा फुफ्फुसावर नेमका कसा परिणाम होतो. याचा अभ्यास करण्यासाठी चंद्रपुरात कृत्रिम फुफ्फूस उभारण्यात आले आहे. यातून मानवी फुफ्फुसावर या प्रदूषणाचा कसा आणि किती परिणाम होतो, याचा अंदाज घेता येणार आहे.

चंद्रपुरातील या कृत्रिम फुफ्फुसात हवेतील प्रदूषणाचे कण जातील. त्याचा परिणाम त्या फुफ्फुसावर पडणार आहे. तो काळा पडत जाण्याची शक्यता आहे. हा परिणाम किती आणि कसा होईल, याचा अभ्यास यातून केला जाणार आहे.

चंद्रपूर शहरात वायू प्रदूषण संदर्भात कृत्रिम फुफ्फुसांची उभारणी करण्यात आली. शहराच्या मुख्य चौकात इको प्रो-वातावरण फाउंडेशन आणि मनपाने हा उपक्रम सुरू केला.
चंद्रपूर शहरातील वायू प्रदूषणाची गंभीरता नागरिक- प्रशासनाला कळावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. चंद्रपुरात कोळसा खाणी आहेत. याचा परिणाम प्रदूषणावर होतो. श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात होतात. हवेतून प्रदूषित कण मानवी फुफ्फुसात जातात.

गंभीरता नागरिकांना कळावी

चंद्रपूर शहरात वायू प्रदूषण मोजणीसाठी कृत्रिम फुफ्फुसांची उभारणी करण्यात आली आहे. शहराच्या मुख्य चौकात इको प्रो- वातावरण फाउंडेशन आणि मनपाने हा उपक्रम सुरू केला आहे. चंद्रपूर शहरातील वायू प्रदूषणाची गंभीरता नागरिक-प्रशासनाला कळावी यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. गेली काही वर्षे चंद्रपूर जिल्ह्यात भूमी-जल-वायू प्रदूषणाने सर्व विक्रम मोडीत काढले होते. चंद्रपूर जिल्हा देशातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये गणला जात होता. आताही परिस्थिती फारशी समाधानकारक नाही.

विदर्भातील पहिलाच प्रयोग

हा विदर्भातील पहिलाच प्रयोग आहे. याआधी मुंबई आणि खारघर येथेही कृत्रिम फुफ्फूस प्रकल्पांची उभारणी करण्यात आली. याच ठिकाणी हवेतील पीएम 10 आणि पीएम 2.5 या दोन घटकांची सेन्सर्सद्वारे मोजणी केली जात आहे. प्रकल्प लोकार्पण होताच 0 ते 50 आवश्यक असलेला वायू प्रदूषण निर्देशांक चक्क चौपट असल्याचा धक्कादायक निष्कर्ष नोंदविला गेला. यापुढच्या काळात ही कृत्रिम फुफ्फुसे काळी पडून वायू प्रदूषण निर्देशांक गंभीर स्थितीत पोचणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

नागपुरातील भाजपच्या ३१ नेत्यांवर गुन्हे दाखल, जमावबंदी असताना काढला होता मोर्चा

गर्भवती असल्याची कल्पनाच नव्हती, 47 व्या वर्षी दिला बाळाला जन्म