
नांदेडच्या गुरुद्वाराला पंजाबच्या एका भाविकाने तब्बल पावणेदोन कोटी रुपयांची "कलगी" भेट दिलीय.

कर्तारपूर इथल्या डॉक्टर गुरुविंदरसिंघ सामरा यांनी ही बहुमूल्य भेट गुरुचरणी अर्पण केलीय.

हिऱ्यानी मढवलेल्या या सोन्याच्या कलगीला करण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागल्याचे डॉक्टर सामरा यांनी सांगितलंय.

नांदेडच्या गुरुद्वारात येऊन डॉक्टर सामरा यांनी ही कलगी गुरुद्वारा बोर्डाकडे सुपूर्त केलीय.

हैद्राबाद , दिल्ली, सुरत आणि जयपूर इथल्या कारागिराने ही कलगी तयार केलीय.