“पीक कर्जाच्या जाचक अटी शिथिल करणार”; कृषीमंत्र्यांने असं अश्वासन का दिले..

| Updated on: Jun 21, 2023 | 9:14 PM

शेतकऱ्यांन जर बँकेतून कर्ज घ्यायचे असेल तर अनेक अडचणी येत असतात. ऐनवेळी शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी पैसा उपलब्ध होत नाही.

पीक कर्जाच्या जाचक अटी शिथिल करणार; कृषीमंत्र्यांने असं अश्वासन का दिले..
Follow us on

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी अनेकांची संकटांचा सामना करत आहे. ऐन हंगामात अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. कधी पावसाचे संकच तर कधी शेतमालाला बाजारभाव अनेक अटी लावल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळतानाही अनेक समस्या येत आहेत. त्यामुळेच आता शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना बँकेमधून कर्ज देतानाही अनेक समस्या येत असल्याने शेतकऱ्यांना कर्ज देताना अटी व नियम शिथिल करण्यात याव्यात अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात आली आहे.

राज्यातील शेतकरी अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या आर्थिक समस्यांनी त्रस्त आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून कर्ज मिळताना अनेक अडचणी येत होत्या.

शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय

त्यामुळे शेतकरी हतबल झाला होता. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना जाचक अटी रद्द करुन त्वरित कर्ज मिळावे अशी मागणीही शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून केली होती. त्यामुळेच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या समस्या प्रचंड जाणवत असल्यामुळेच आता थेट त्या समस्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपाय सांगितला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

कृषिमंत्र्यांचा निर्णय

धाराशिव जिल्ह्यात पीक कर्जासाठी जाचक अटी लावल्याचा प्रकार समोर आला होता. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबलही झाला होता. त्यामुळे आता या प्रकाराकडे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे लक्ष वेधले गेले आहे.

त्याबाबतीत मुख्यमंत्री लवकरच सर्व संबंधितांची बैठक घेणार असून जाचक अटी शिथिल करण्यात येतील असे आश्वासन कृषिमंत्री सत्तार यांनी दिल आहे. त्यामुळे आता तरी शेतकऱ्यांना कर्ज मिळताना जाचक अटींचा सामना करावा लागणार नाही असे मत व्यक्त केले जात आहे.

कर्जबाजारीपणातून आत्महत्या

शेतकऱ्यांन जर बँकेतून कर्ज घ्यायचे असेल तर अनेक अडचणी येत असतात. ऐनवेळी शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी पैसा उपलब्ध होत नाही. ज्या प्रमाणे कर्जामुळे जसे शेतीचे प्रश्न निर्माण होते असतात, त्याच प्रमाणे शेतकरीही पैसा उपलब्ध नसल्यामुळे कर्जबाजारीही होत असतात. त्यातूनच शेतकरी आत्महत्या करत असतात असं मतही शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. कृषिमंत्र्यांनी कर्जसाठीच्या जाचक अटी रद्द केल्या तर मात्र त्याचा फायदा असंख्य शेतकऱ्यांना होणार आहे.