Meteor Shower or Satellite ? चंद्रपुरातील पवनपारमध्ये सापडला साडेपाच किलोचा गोळा; प्रशासन करणार तपास

| Updated on: Apr 03, 2022 | 12:56 PM

आकाशातून पडलेला हा गोळा नक्की काय याबाबत मात्र चर्चांना उधाण आले आहे. तहसील प्रशासनाने गोळा ताब्यात घेतला. यासंदर्भात वरिष्ठांना माहिती दिली. लाडबोरी येथे कोसळलेल्या रिंग सदृश्य वस्तूचा (Ring-like object) अभ्यासकांनी आढावा घेतला.

Meteor Shower or Satellite ? चंद्रपुरातील पवनपारमध्ये सापडला साडेपाच किलोचा गोळा; प्रशासन करणार तपास
चंद्रपुरात आकाशातून पडलेला हाच तो गोळा.
Image Credit source: tv 9
Follow us on

चंद्रपूर : जिल्ह्यातील पवनपारमध्ये आवकाशातून पडलेल्या वस्तूचा एक भाग सापडला. जवळपास साडेपाच किलो वजनाचा हा धातूचा गोळा आहे. पवनपारजवळच्या जंगलात (Forest near Pawanpar) हा गोळा सापडल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. प्रशासनाने स्थानिकांशी संपर्क साधला. आकाशातून पडलेला हा गोळा नक्की काय याबाबत मात्र चर्चांना उधाण आले आहे. तहसील प्रशासनाने गोळा ताब्यात घेतला. यासंदर्भात वरिष्ठांना माहिती दिली. लाडबोरी येथे कोसळलेल्या रिंग सदृश्य वस्तूचा (Ring-like object) अभ्यासकांनी आढावा घेतला. न्यूझीलंडमधून प्रक्षेपित झालेल्या रॉकेटचा बूस्टर पार्ट (Booster part of rocket ) असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मोहफुल वेचणाऱ्यांना सापडली वस्तू

मात्र इसरो अथवा अन्य कुठल्याही अंतराळ संशोधन यंत्रणेने अशा पद्धतीने कुठली वस्तू पडली असावी याबाबत अधिकृत खुलासा केलेला नाही. सिंदेवाही तालुक्यातील पवनपार गावाजवळील जंगलात मोहफुल वेचणाऱ्यांना हा दिसला. काल रात्री आकाशातून आगीचे लोळ दिसले. घटनेनंतर राज्यात कुतूहलाची स्थिती निर्माण झाली आहे.

गोलाकार अवजड रिंग

आकाशातील या घटनेचा वस्तू स्वरूपातील भाग लाडबोरी येथे कोसळला. ही रिंग सदृश्य वस्तू, मोठ्या आवाजासह अवजड रिंग जमिनीवर कोसळली. ही रिंग स्थानिकांनी सिंदेवाही पोलीस ठाण्यात दिली. अत्यंत अवजड असलेली ही रिंग सिंदेवाही ठाण्यात ठेवण्यात आली आहे. खगोल अभ्यासक यांनी पाहणी केली. ही वास्तू बूस्टर रिंग असल्याचचे खगोल अभ्यासकांनी सांगितले. सॅटॅलाइट बूस्टर आहे. हे बूस्टर काल न्यूझीलँड येथून सोडण्यात आल्याचं सांगितलं जातं. ही वस्तू मिश्र धातूंनी बनलेली ही अवजड रिंग सॅटॅलाइट बूस्टर आहे.

अकोल्यातही आकाशात गोळे

अकोल्यातही काल सायंकाळी अंधार पडला. आकाश अगदी निरभ्र असताना अचानक आकाशात उत्तरेकडून दक्षिणकडे जाणारे आगीचे गोळे दिसले. केवळ अकोला शहरातच नव्हे तर जिल्ह्यांमध्येही असाच नजारा पहावयास मिळाल्याची वार्ता पसरली. व्हिडीओ व्हायरल झाले. हा सर्व प्रकार शनिवारी रात्री घडला.

Video : Sanjay Raut on Raj Thackeray | अक्कलदाढ एवढी उशिरा का येते?; संजय राऊतांची राज ठाकरेंवर खोचट टीका

Nagpur | बाबा जुमदेव यांचा जन्मदिन : महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम, परमात्मा एक मानव धर्माची स्थापना

Nagpur Election | यूपीच्या पराभवाने बसपाचे चिंतन; प्रशिक्षण शिबिर लवकरच; नागपुरात महापौर बनाओ अभियान