Nanded Bride : नवरदेवाला घरी बसवून नवरी पळाली प्रियकरासोबत, लग्नानंतर चार दिवसातच पलायन

| Updated on: May 01, 2022 | 6:59 PM

सावरगाव येथील एका युवतीचे प्रेमसंबंध गावातीलच एका युवकासोबत होते. पण दोघे भावकीतील असल्याने घरच्यांनी लग्नाला विरोध दर्शिवला. युवतीचे लग्न भोकर तालुक्यातील कीनी पालज येथील युवकाशी रीतीरिवाजाप्रमाणे 21 एप्रिल रोजी झाले तर प्रियकराचे लग्न 20 मे रोजी ठरले होते. पण प्रेम आंधळे असते म्हणतात ना त्याला समाजाची रीत कळत नाही. तसेच झाले.

Nanded Bride : नवरदेवाला घरी बसवून नवरी पळाली प्रियकरासोबत, लग्नानंतर चार दिवसातच पलायन
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: TV9
Follow us on

मनाठा : ऐकावे ते नवलच ! सावरगाव येथील एका नववधुने लग्न झाल्यानंतर सासरहून माहेरी मांडव परतणीसाठी आलेल्या नवरी (Bride)ने घरी बसवून प्रियकरा (Boyfriend)सोबत धूम ठोकली. लग्नानंतर चार दिवसातच नवरी पळून गेल्याने आईवडीलांसह नवरदेवालाही धक्का बसला आहे. नववधू घरी दिसत नसल्याने शोधाशोध सुरु झाली पण नववधू सापडली नाही. मग प्रियकराच्या घरी शोध घेतला असता तोही फरार असल्याचे लक्षात आल्याने घटना काय घडली हे नातेवाईकांना कळले. त्यांनी मनाठा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. विशेष म्हणजे या प्रियकराचेही लग्न 20 मे ला करण्याचे ठरले होते. या प्रेमी युगलाच्या धाडसामुळे चार कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. (Four days after the marriage, the bride ran away with her boyfriend)

दोघेही भावकीतील असल्याने घरच्यांचा लग्नाला विरोध होता

सावरगाव येथील एका युवतीचे प्रेमसंबंध गावातीलच एका युवकासोबत होते. पण दोघे भावकीतील असल्याने घरच्यांनी लग्नाला विरोध दर्शिवला. युवतीचे लग्न भोकर तालुक्यातील कीनी पालज येथील युवकाशी रीतीरिवाजाप्रमाणे 21 एप्रिल रोजी झाले तर प्रियकराचे लग्न 20 मे रोजी ठरले होते. पण प्रेम आंधळे असते म्हणतात ना त्याला समाजाची रीत कळत नाही. तसेच झाले. दोघांनी एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या पण रीत आडवी आली. दोघे भावकीतील असल्याने लग्नास नातेवाईकांनी विरोध करीत दोघांच्याही सोयरीकी झाल्या पण दोघे एकमेकांच्या प्रेमात एवढे डुबले की त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. पण मुलीवर पहारा वाढल्याने दोघांचा नाईलाज झाला. शेवटी एप्रिल महिन्याच्या 21 तारखेला मुलीचे लग्न झाले.

मांडव परतणीसाठी माहेरी आली

नववधू लग्नानंतर सासरला गेली एक दोन दिवस राहून मांडव परतणीसाठी माहेरी वापस आली आणि पळून जाण्याची खिचडी शिजली. इकडे मुलीचा विवाह झाल्याने आईवडील बिनधास्त होते व गाफिल राहिले. नवरी परतीने आल्यानंतर नवरदेव 25 एप्रिल रोजी नववधुस घेण्यासाठी सावरगावला आला. मुक्काम केला. सकाळी आपल्या नववधुला घेऊन सासरी जाणार होता. पण सकाळी नैसर्गिक विधीला जाण्याचे निमित्त करुन नववधुने गावातील प्रियकरासोबत धूम ठोकली. (Four days after the marriage, the bride ran away with her boyfriend)

हे सुद्धा वाचा