महाराष्ट्राची सेवा करणाऱ्या ST कर्मचाऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणं लाजिरवाणी गोष्ट, पण सरकारला आर्यन खानची काळजी: गोपीचंद पडळकर

| Updated on: Oct 29, 2021 | 2:37 PM

ठाकरे सरकारमधील एक ही मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी गेला नाही, असा आरोप भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे

महाराष्ट्राची सेवा करणाऱ्या ST कर्मचाऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणं लाजिरवाणी गोष्ट, पण सरकारला आर्यन खानची काळजी: गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर, भाजप आमदार
Follow us on

सोलापूर (पंढरपूर): राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे अशा वेळी ठाकरे सरकारमधील एक ही मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी गेला नाही, असा आरोप भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. मात्र, महाविकास आघाडीमधील मंत्री आर्यन खानची काळजी घेण्यामध्ये व्यस्त आहेत, असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पंढरपुरात ठाकरे सरकारला लगावला.

मंत्र्यांनी आत्महत्याग्रस्त एसटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना भेट दिली का?

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन सुरू आहे. एसटीच्या प्रश्नावर काल राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. परंतु, राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये फूट पाडून संप मोडीत काढला आहे. त्यानंतर आज अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. आतापर्यंत राज्यात अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, आत्तापर्यंत एक ही राज्य सरकारचा मंत्री आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेला नाही त्यांना कोणतीही मदत केली नाही असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचा आर्यन खानच्या सुटकेसाठी प्रयत्न

दुसरीकडे मात्र हे ठाकरे सरकार मधील मंत्री ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या सुटके बाबत प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. हे सरकार आणि गांजा माफियांच्या मागे असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पंढरपुरात पत्रकार परिषदेत बोलताना केला.

राज्य सरकारकडून 28 टक्के महागाई भत्ता जाहीर

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करत असल्याचं जाहीर केलं होतं. ॲड. अनिल परब यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने पुकारलेले बेमुदत उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले होते. मात्र, काही एसटी कर्मचारी संघटनांनी आंदोलन सुरुचं ठेवलं आहे.

अहमदनगरमध्ये एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

अहमदनगरला शेवगाव येथील एसटी चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केलीये. शुक्रवारी सकाळी ही घटना घडलीये. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जातेय. शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे वय 50 असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. काकडे यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि मुलगी आहेय. मोठा मुलगा पुण्यात कंपनीमध्ये आहे तर दुसरा मुलगा संस्थेमध्ये नोकरी करत असून मुलीचे लग्न झाले आहेय. गेल्या दोन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. त्यातच ही आत्महत्या करण्यात आलीये. मात्र आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकले नाहीये. तर डेपोत उभ्या असलेल्या एसटीच्या मागील बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळा उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच आगराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना समजताच मोठी खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेय.

इतर बातम्या:

VIDEO: काँग्रेस नेते वेल कल्चर, ते दरोडेखोर नसतात, पण राष्ट्रवादीचा भरवसा नाही; चंद्रकांत पाटलांची टोलेबाजी

Tripura Riots: सलग सातव्या दिवशी त्रिपुरामध्ये हिंसाचार सुरुच; हिंदुत्ववादी संघटनांकडून मशिदींवर हल्यांचा आरोप

Gopichand Padalkar said Thackeray Government is not caring ST Workers but care Aryan Khan